मुंबई, 08 जून : देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबई कधी नव्हे ती बंद पडली होती. तब्बल 2 महिने मुंबई ही बंद होती. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेली मुंबईत आजपासून पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अनलॉक 1 मध्ये सरकारी आणि खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्यामुळे नोकरदार वर्ग बाहेर पडला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक आणि कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयामध्ये 10 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासून मुंबईतील वेगवेगळ्या भागातून नोकरदार वर्ग बाहेर पडला आहे.
Mumbai: Heavy traffic jam seen on Western Expressway Highway. #Maharashtra pic.twitter.com/43ov1KKUgI
— ANI (@ANI) June 8, 2020
मोठ्या संख्येनं नोकरदार बाहेर पडल्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली आहे. कांदिवलीहुन मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे. हेच चित्र ठाणे, पालघरमध्ये पाहण्यास मिळालं आहे.
डोंबिवली, ठाणे, बदलापूर, अंबरनाथसह इतर भागातून वाहनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कल्याण-शीळ महामार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईकर निघाले कामाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी.. पण काळजी घेणं गरजेचं! pic.twitter.com/Gur8KgJWR9
— News18Lokmat (@News18lokmat) June 8, 2020
तर दुसरीकडे डोंबिवली नोकरदार वर्गाचे लोकल बंद असल्याने आणि अतिशय अपुऱ्या बस सेवेमुळे प्रचंड हाल होत आहेत. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरात चाकरमान्यांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली आहे. बस पकडण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. नोकरदारांची ही रांग फडके रोड परिसरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवा शहरातील नोकरदार वर्गही कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडला आहे. बस पकडण्यासाठी नोकरदारांची मोठी गर्दी झाली असून लांबच्या लांब रांगा लागल्या आहे.
डोंबिवलीमध्ये नोकरदारांचे प्रचंड हाल, लांबच्या लांब रांगा pic.twitter.com/CbsUlpFylt
— News18Lokmat (@News18lokmat) June 8, 2020
पहिल्याच दिवशी अपुऱ्या बस सेवेमुळे राज्य सरकारच्या उपाययोजनेचा फज्जा उडाला आहे. आज सोमवारपासून मुंबई हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती. पण, बसेसचे अपुरे नियोजन असल्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.