काकीनाडा (आंध्र प्रदेश), 08 जून : देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील मृत्यूदर कमी असला तरी कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका जास्त वाढला आहे. यातच आंध्र प्रदेशातील काकीनाडा हे शहर एका फोटोग्राफरमुळं हादरलं आहे. काकीनाडापासून 20 किमीवर असलेले गोल्लाला ममीददा हे गाव कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहे. या एकट्या गावात कोरोनाचे तब्बल 116 रुग्ण आहेत. या सगळ्या मागचे कारण ठरला एक फोटोग्राफर. या गावातील 53 वर्षीय व्यक्तीचा 20 मे रोजी मृत्यू झाला, ही व्यक्ती फोटोग्राफर असून गावात विविध कार्यक्रमांना उपस्थित होती. या व्यक्तीमुळेच कोरोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही मृत व्यक्ती पेडापुडी मंडल, रामचंद्रपूरम,अनापर्ती,बिक्कावोलू आणि मंदेपेटा मंडल या गावात कार्यक्रमांसाठी गेली होती. त्यानंतर या गावात तब्बल 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रामचंद्रपूरममध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात फोटो काढत असताना या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा- UNLOCK च्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत नोकरदारांचे हाल, बससाठी रांगाच रांगा! मुख्य म्हणजे ही व्यक्ती मास्कशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित होती. या फोटोग्राफर व्यक्तीचा मुलगाही कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं होतं. या मुलानेही याच दरम्यान काही मित्रांसोबत पार्टी केली होती. त्यामुळं या व्यक्तीमुळं कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखला जात आहे. वाचा- काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS दरम्यान, पूर्व गोदावरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 300 रुग्ण आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे एकूण 4,510 रुग्ण आहेत. यातील 2,620 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत तर, 73 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा- खासगी लॅबमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेर तपासले निगेटिव्ह; मुंब्य्रात प्रकार समोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.