मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भयंकर! गर्भाशयातच झाला बाळाचा कोरोना मृत्यू, आईमुळे बाळालाही झाला होता Covid

भयंकर! गर्भाशयातच झाला बाळाचा कोरोना मृत्यू, आईमुळे बाळालाही झाला होता Covid

Corona

Corona

Coronavirus Update: या 29 वर्षीय महिलेला दोन दिवस ताप येत होता आणि तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली होती.

नवी दिल्ली, 2 मार्च : जगभरात अजूनही कोरोनामुळे (Corona Virus) भीतीचं सावट कायम आहे. कोरोनाची (Covid 19) भीती अद्याप कमी झालेली नाही. अशातच इस्रायलमध्ये (Israel) एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या बाळाचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही महिला सहा महिन्यांची गर्भवती असताना तिला इस्रायलच्या मीर मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 29 वर्षीय या महिलेला दोन दिवस ताप येत होता आणि तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली होती.

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असं सांगितलं की, 'ही एक दुर्मिळ घटना आहे आणि इस्रायलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे.' मीर मेडिकल सेंटरचे डॉक्टर ब्रोश यांनी वाईनेट वेबसाइटशी बोलताना सांगितलं की, 'कोरोना व्हायरसमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.'

डॉक्टर ब्रोश यांनी पुढे सांगितलं की, 'जर महिलेला पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीमध्ये लस दिली असती तर ही दु:खद घटना टाळता येऊ शकली असती. हे भ्रूणाचं इंट्रायूटेरिन इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूची शक्यता वाढते. या प्रकरणात महिलेनं सांगितले की, 'कोरोना होऊ नये यासाठी मी खूप सावधानगिरी बाळगत होते. असं असून सुद्धा मला या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.'

टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय या बाळाच्या मृत्यूचं कारण सांगण्यास असमर्थ आहे. पण या गोष्टीची जास्त शक्यता आहे की बाळाचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळेच झाला आहे. याआधी देखील इस्रायलमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या बाळाचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुद्धा असं सांगितलं गेलं की हे बाळ गर्भाशयामध्ये असताना कोरोना पॉझिटिव्ह झालं होतं.

अवश्य वाचा -  Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर

इस्रायलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सध्या याठिकाणी लसीकरण सुरु असून फाइजर वॅक्सिनचा वापर केला जात आहे. इस्रायलमधील नागरीकांना तीन आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. अशातच ब्रिटनमध्ये तीन महिन्यानंतर दुसरा डोस दिला जात आहे. पब आणि शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या इस्रायलमधील नागरिकांना लस घेतल्याचा पुरावा मागितला जात आहे. इस्रायलमध्ये ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना ग्रीन पासपोर्ट दिला जात आहे. इस्रायलमध्ये काही जागा अशा आहेत त्याठिकाणी फक्त ग्रीन पासपोर्ट असणाऱ्यांना इन्ट्री दिली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Covid19, Israel, Pandemic