मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'पतीला सेक्ससाठी कधीही नकार देऊ नका', मॉडेलच्या सल्ल्यानंतर गदारोळ

'पतीला सेक्ससाठी कधीही नकार देऊ नका', मॉडेलच्या सल्ल्यानंतर गदारोळ

तिच्या या प्रतिक्रियेवरून समाजमाध्यमांवर (Social Media) उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी तिच्या या प्रतिक्रियेचं स्वागत केलं आहे तर काहींनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे

तिच्या या प्रतिक्रियेवरून समाजमाध्यमांवर (Social Media) उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी तिच्या या प्रतिक्रियेचं स्वागत केलं आहे तर काहींनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे

तिच्या या प्रतिक्रियेवरून समाजमाध्यमांवर (Social Media) उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी तिच्या या प्रतिक्रियेचं स्वागत केलं आहे तर काहींनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे

  वॉशिंग्टन, 30 जुलै : पती आणि पत्नीचं नातं हे प्रेम आणि जिव्हाळ्याचं असतं. असं म्हटलं जातं की या नात्यासाठी आपण एकमेकांना जेवढा वेळ देऊ तेवढं हे नातं खुलत जातं. नातं खुलवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जोडीदारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. कधी सहलीला, डेटवर जाणं तर कधी सरप्राईझ गिफ्ट (Surprise gift) देऊन खुश करणं, अशा गोष्टी बहुतेकजण करत असतात. मात्र हेच नातं अजून फुलवायचं असेल, आयुष्य अधिक आनंदी बनवायचं असेल तर पतीबरोबर दररोज सेक्स (Sex) करा. त्याला कधीही नाही म्हणू नका, असं मत अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल कॅप्रिस बोरेट हिने व्यक्त केलं आहे. तिच्या या प्रतिक्रियेवरून समाजमाध्यमांवर (Social Media) उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी तिच्या या प्रतिक्रियेचं स्वागत केलं आहे तर काहींनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे. याबाबतचं वृत्त आजतकनं दिलं आहे.

  एका मॅगझीनला दिलेल्या मुलखातीमध्ये कॅप्रिसनं सेक्सवर आपलं मत व्यक्त केलं आहे. कॅप्रिसनं म्हटले की, महिलांनी आपल्या पतीला सेक्ससाठी कधीही नकर देऊ नये. पतीबरोबर सेक्ससाठी कायम तयार असलं पाहिजे. दररोज सेक्स करायला हवं. सेक्ससाठी 5-10 मिनिटं देऊन आयुष्य अजून आनंदी बनवलं जाऊ शकतं. मी आणि माझा पती दररोज सेक्स करतो. पुरुष भोळे असतात आणि त्यांना खूश करणं खूप सोपं असतं. उत्तम स्वयंपाक करणं, त्याचं कौतुक करणं आणि सेक्ससाठी नेहमी तयार असणं या तीन गोष्टी पाळून तुम्ही खूप सहज पुरुषाचं मन जिंकू शकता. बेडरूममधील (Bedroom) कोणत्याही गोष्टीबद्दल महिलांनी तक्रार करू नये. तसंच नवऱ्याने सेक्स करण्याबद्दल विचारलं तर मी खूप थकलीय किंवा माझं डोकं दुखतंय असं अजिबात म्हणू नये असा सल्लाही तिनं दिला आहे.

  हे ही वाचा-VIDEO : महाकाय सापांचा 'बाप' आहे ही व्यक्ती; संपूर्ण अंगभर लटकत खेळतात ही 'बाळं'

  भारतात सेक्स या विषयावर एवढं मनमोकळं आणि भरभरून बोललं जातं नाही. विशेषतः महिलांकडून असं मत ऐकायला मिळत नाही. अमेरिकन मॉडेल कॅप्रिसनं सेक्सवर आपलं मत मनमोकळे पणाने व्यक्त केलं आहे. कॅप्रिसचं वय 49 वर्षं असून तिला दोन मुलं आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) वेळी मी खूपच ॲक्टिव्ह (active) आणि क्रिएटीव्ह (Creative) होते. मात्र दुसऱ्या लॉकडाऊनच्यामध्ये तणावामध्ये होते. हा तणाव दूर करण्यासाठी सेक्सचा आधार घेतला. सेक्सशिवाय रिलेशनशिपला (Relationship) काहीच अर्थ नाही. त्यामुळे ती जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असंही ती म्हणाली. लग्नानंतर माझं जीवन एकदम बदललं आहे. पती आणि माझ्यामध्ये भांडणं होत असली तरी विवाहित असल्यानं आम्ही मानसिकदृष्ट्याही एकमेकांशी जोडलेले आहोत. लग्नानंतर जोडीदाराला सोडून जाण्याचा विचार करणं सोपं नाही, असंही ती म्हणाली.

  कॅप्रिसच्या प्रतिक्रियेवर मोठी टीकासुद्धा होत आहे. UK ची प्रसिद्ध पत्रकार बेल मूनी हिने कॅप्रिसच्या वक्तव्याला वायफळ आणि आतापर्यंतचा हा महिलांना देण्यात आलेला सर्वात मूर्खपणाचा सल्ला आहे असं म्हटलं आहे. डेली मेलशी बोलताना ती म्हणाली, ‘ नोकरी करणाऱ्या, स्तनदा किंवा मेनोपॉज सुरू असलेल्या महिलांना असा सल्ला देणं चुकीचं आहे. त्यांना थकवा येणं डोकं दुखणं सहाजिक आहे त्यामुळे त्या सदैव सेक्ससाठी तयार असणारच नाहीत. कोणत्याही रिलेशनशिपसाठी सेक्सपेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं.’

  कॅप्रिसच्या वक्तव्यावर लेखिका केट स्पायसरने म्हटलं आहे की, ‘सेक्सविषयी कोणत्याही महिलेला सल्ला देणं चुकीचं आहे. सेक्स हे एखाद्याच्या जीवनात आनंद आणू शकतं तसंच त्याला वाईट अनुभवही येऊ शकतात. सेक्सशिवाय रिलेशनशिप नाही हे भयभीत करणारं मत आहे. सेक्स जरुरी आहे पण त्यासाठी दोघांकडून संमती पाहिजे.

  पत्रकार मोनिका पॉर्टर ने म्हटलं आहे की, ‘विवाहानंतर शारीरिक संबंध आवश्यक आहेत. मात्र काहीवेळा सेक्ससाठी नकार देणं चुकीचं नसतं. मानसिक स्थिती चांगली नसेल तर सेक्स आपल्याला आनंद देऊ शकत नाही.’ मनोविकारतज्ज्ञ ओलिविआ फेन यांनी म्हटलं आहे की केवळ 10 मिनिटाच्या सेक्सने रिलेशनशिप टिकवली जाऊ शकते, यामध्ये कोणतंही तथ्य नाही. माझं दुसरं लग्न झालं आहे. पहिल्या पतीबरोबर मी रोज सेक्स करायचे. सेक्स एक अशी गोष्ट आहे जेव्हा दोघेही आपली भूमिका व्यवस्थित पार पाडतात तेव्हाच त्यामधून आनंद मिळतो. सेक्स ही केवळ शारीरीक नव्हे तर एकमेकांवर विश्वास व्यक्त करण्याची क्रिया आहे.

  First published:
  top videos

   Tags: Actress, Sex