जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 16 वर्षांपूर्वी पतीचाही विमान अपघातात मृत्यू, अवघ्या 10 सेकंदासाठी ते स्वप्न कायमचं अपूर्ण राहिलं, को-पायलट अंजू यांची कहाणी

16 वर्षांपूर्वी पतीचाही विमान अपघातात मृत्यू, अवघ्या 10 सेकंदासाठी ते स्वप्न कायमचं अपूर्ण राहिलं, को-पायलट अंजू यांची कहाणी

16 वर्षांपूर्वी पतीचाही विमान अपघातात मृत्यू, अवघ्या 10 सेकंदासाठी ते स्वप्न कायमचं अपूर्ण राहिलं, को-पायलट अंजू यांची कहाणी

यती एअरलाइन्सच्या ATR-72 या विमानाच्या को-पायलट अंजू हे उड्डाण यशस्वी झाल्यानंतर ‘कॅप्टन’ पदावर पोहचणार होत्या. विशेष म्हणजे अंजू यांचे दिवंगत पती दीपक पोखरेल हेदेखील अशाचप्रकारे मरण पावले होते

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली 16 जानेवारी : नेपाळ मधील पोखरा विमानतळावर उतरत असताना रविवारी (15 जानेवारी) एक नेपाळी प्रवासी विमान सेती नदीच्या खोऱ्यात कोसळलं. या अपघातात किमान 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या विमानात पाच भारतीय नागरिकांसह एकूण 72 जण प्रवास करत होते. वरिष्ठ कॅप्टन कमल के. सी. आणि को-पायलट अंजू खतिवडा हे या अपघातग्रस्त विमानाचे चालक होते. यापैकी अंजू खतिवडा या आपलं ध्येय गाठण्यापासून अवघ्या काही सेंकद दूर होत्या मात्र, त्या पूर्वीच काळानं त्यांच्यावर घाला घातला. यती एअरलाइन्सच्या ATR-72 या विमानाच्या को-पायलट अंजू हे उड्डाण यशस्वी झाल्यानंतर ‘कॅप्टन’ पदावर पोहचणार होत्या. विशेष म्हणजे अंजू यांचे दिवंगत पती दीपक पोखरेल हेदेखील अशाचप्रकारे मरण पावले होते. 16 वर्षांपूर्वी दीपक यांचासुद्धा विमान अपघातामध्येच मृत्यू झाला होता. ‘इंडिया टूडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Nepal Plane Crash : 72 जणांसह विमान कोसळतानाच पहिला थरारक VIDEO समोर, 45 मृतदेह सापडले रविवारी कॅप्टन होण्याच्या उद्देशानं अंजू यांनी वरिष्ठ पायलट आणि प्रशिक्षक कमल के. सी. यांच्यासोबत उड्डाण घेतलं होतं. पायलट (कॅप्टन) होण्यासाठी किमान 100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आवश्यक असतो. को-पायलट अंजू या आपल्या या ध्येपासून काही मिनिटे दूर होत्या. या पूर्वी त्यांनी नेपाळमधील जवळपास सर्व विमानतळांवर यशस्वीपणे लँडिंग केलेलं होतं. आजच्या यशस्वी लँडिंगनंतर अंजू यांना चीफ पायलटचा परवाना मिळणार होता. मात्र, या ध्येयापासून अवघ्या 10 सेकंद दूर असताना अंजू यांचं विमान आणि स्वप्नं धुरात विरलं. धक्कादायक म्हणजे 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचासुद्धा एका विमान अपघातामध्येच मृत्यू झाला होता. 21 जून 2006 रोजी झालेल्या यती एअरलाइन्सच्या विमान अपघातात अंजू यांनी आपला जोडीदार गमावला होता. 16 वर्षांपूर्वी, नेपाळगंजहून सुरखेत मार्गे जुमला येथे जात असताना यती एअरलाइन्सचं 9N AEQ विमान कोसळलं होतं. या अपघातात सहा प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स ठार झाले होते. मारल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांचाही समावेश होता. या व्यतिरिक्त, रविवारी पोखराला उड्डाण करणाऱ्या विमानात कॅप्टन कमल के. सी. हे चीफ पायलट होते. त्यांना 35 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी या पूर्वी अनेक पायलटना प्रशिक्षण दिलं होतं. त्यांनी प्रशिक्षण दिलेले पायलट कमालीचे यशस्वी ठरले आहेत. विमानाच्या चाकात लपून केला 6500 KM प्रवास, पण 10 तासानंतर…; आजही थरकाप उडवते त्या 2 भावांची कहाणी दरम्यान, रविवारी यती एअरलाइन्सच्या ATR-72 या विमानानं जुन्या देशांतर्गत विमानतळावरून पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. या उड्डाणासाठी 27 मिनिटांचा कालावधी लागणार होता. मात्र, इच्छित स्थळी पोहचण्यापूर्वीच सेती नदीच्या काठावर असलेल्या जंगलात हे विमान कोसळलं. यती एअरलाइन्सनं दिलेल्या माहितीनुसार या विमानात पाच भारतीयांसह 68 प्रवासी आणि काही क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत एकूण 70 मृतदेह अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: airplane , Nepal
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात