Home /News /videsh /

NASA चं नवं मिशन; चंद्र, मंगळानंतर आता पृथ्वीसमान दिसणाऱ्या ग्रहावर जाण्याची तयारी

NASA चं नवं मिशन; चंद्र, मंगळानंतर आता पृथ्वीसमान दिसणाऱ्या ग्रहावर जाण्याची तयारी

पृथ्वीसमान दिसणाऱ्या या ग्रहाला शास्त्रज्ञ सिस्टर प्लॅनेट म्हणतात

    नवी दिल्ली, 15 जुलै : अंतराळाबाबत सर्वसामान्यांसह शास्त्रज्ञांनाही मोठं कुतुहल असतं. विविध मिशनच्या माध्यमातून अंतराळात सुरू असलेल्या हालचालींबाबत माहिती मिळवली जाते. नुकतचं नासाने शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मिशन जाहीर केले आहे. सहा वर्षांनंतर लॉन्च होणाऱ्या या मिशनमध्ये काही युरोपियन देशांचादेखील सहभाग आहे. काय आहे ही मोहीम नासाने अलीकडेच आपल्या वेरिटस मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नासाचे म्हणणे आहे की- या अभियानाचा उद्देश पृथ्वी समान दिसणाऱ्या ग्रहाचा खोलात जाऊन अभ्यास करण्याचा आहे. विशेष म्हणजे जेथे शुक्र ग्रहाचा निर्माण पृथ्वीसह झाला होता, मात्र हा ग्रह पृथ्वीहून बराच वेगळा आहे. तेथे पृथ्वीसारखे जीवन का नाही शास्त्रज्ञ दोन्ही ग्रहांना सिस्टर प्लॅनेट म्हणतात. नासाने सांगितले की जेव्हा दोन ग्रह एकत्र आणि एकसाखरे बनले होते, मग त्यांच्यात असा फरक कसा. हेच समजून घेणं वेरिटसचं उद्दीष्ट आहे. या व्यतिरिक्त, संशोधकांचा असा विश्वास आहे की हे पृथ्वीच्या विकासाबद्दल देखील माहिती मिळू शकते. हे वाचा-निशब्द! तीन महिन्यांपासून गरजुंना मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनाने घेतला जीव सन 2026 मध्ये नासाची वेरिटास सुरू करण्याची योजना आहे. त्याचे ध्येय फ्रेंच स्पेस एजन्सी (एफएसए), जर्मनी स्पेस एजन्सी (जीएसए) आणि इटालियन स्पेस एजन्सी (आयएसए) यांच्या सहकार्याने तयार केले जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, अंतराळ यान शुक्र ग्रहाची परिक्रमा करेल आणि उच्च तंत्रज्ञानाच्या रडार यंत्रणेच्या सहाय्याने या ग्रहाचा 3 डी नकाशा तयार करेल. या व्यतिरिक्त हे ग्रहांच्या अंतर्गत भागांचा अभ्यास करण्यासाठी गुरुत्वाकर्षण क्षेत्राचेही मापन करेल. शुक्र पृथ्वीपेक्षा इतका वेगळा का आहे नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत वेरिटासच्या मुख्य तपासनीस सुझान स्म्रेकर असे म्हणतात – शुक्र ही एका अपघातातून मिळालेली खगोलशास्त्रीय भेट आहे. ती म्हणते की, "आपल्याकडे पृथ्वी आणि शुक्र हे दोन ग्रह आहेत, या दोघांचा एकाच वेळी प्रारंभ झाला. परंतु त्यांचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झाला परंतु हे का घडले हे आम्हाला माहिती नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nasa

    पुढील बातम्या