निशब्द! गेल्या 3 महिन्यांपासून गरजुंना मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनाने घेतला जीव

निशब्द! गेल्या 3 महिन्यांपासून गरजुंना मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनाने घेतला जीव

कोरोनाचा धोका असतानाही जीवापेक्षा माणुसकी मोठी म्हणत ते दिवस-रात्र लोकांची मदत करीत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अशात अनेक कोरोना योद्ध्या मैदानात उतरुन गरजुंची मदत करीत आहेत. पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अनेक स्वयंसेवी कार्यकर्ते या काळात पुढे आले व लॉकडाऊनमुळे उपासरमार झालेल्यांना दोन वेळचं अन्न पुरवलं. कोरोनाचा धोका असतानाही जीवापेक्षा माणुसकी मोठा म्हणत ते दिवस-रात्र लोकांची मदत करीत होते.

अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील नागरी संरक्षण स्वयंसेवक अरुण सिंह गेले तीन महिने गरजुंना मदत करीत होते. पण कोरोनाने त्यांच्यावर काळाता घाला घातला. कोरोनाचा या कहरात त्यांचा मृत्यू झाला.

13 जुलै रोजी अरुण सिंह यांचं निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. महिन्याच्या सुरुवातीला अरुण सिंह याची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 4 जुलै रोजी त्यांना द्वारका विभागातील वेंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला.

दिल्लीतील कोविड रिस्पॉन्स सिस्टमचा आधार असलेल्या हजारो स्वयंसैनिकांपैकी ते एक होते.अरुण सिंह हजारो गरजुंना अन्न-धान्यासह आवश्यक वस्तू पुरवित होते. ते कामादरम्यान व्यवस्थित काळजी घेत होते. मात्र त्यातही त्यांना संसर्ग झाला. त्यांचा मुलगी नववीत आहे तर मुलीने बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुलीचा सोमवारी निकाल आला मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन त्यांच्या कार्याला सलाम दिला.

Published by: Meenal Gangurde
First published: July 15, 2020, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading