Home /News /videsh /

वायू प्रदूषण करणाऱ्यांची नासा 'इज्जत' काढणार, डेटा सार्वजनिक करणार

वायू प्रदूषण करणाऱ्यांची नासा 'इज्जत' काढणार, डेटा सार्वजनिक करणार

नासाने (NASA) आता जवळपास संपूर्ण अवकाश व्यापले आहे आणि आता ते अगदी तुमच्या घराजवळ येऊन पोहोचलं आहे,असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आता ही अवकाश यंत्रणा वायू प्रदुषणाविरोधात (Air Pollution)लढा देणार आहे.

वॉशिंग्टन, 27 एप्रिल : नासाने (NASA) आता जवळपास संपूर्ण अवकाश व्यापले आहे आणि आता ते अगदी तुमच्या घराजवळ येऊन पोहोचलं आहे,असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आता ही अवकाश यंत्रणा वायू प्रदुषणाविरोधात (Air Pollution)लढा देणार असून,जे कोणी प्रदुषणास कारणीभूत ठरत आहेत त्या घटकांची सर्व माहिती सार्वजनिक करणार आहे. याकरिता आवश्यक साधनांची निर्मिती नासा करीत आहेत. खरं तर नासा प्रदुषण वाढीस मदत करणारे सुपर उत्सर्जक कसे वर्तन करतात, वातावरण प्रदुषित करणारे वायू कसे बाहेर टाकले जातात हे ओळखू शकणार आहे. या अनुषंगाने नासा सध्या कार्बन मॅपर (Carbon Mapper) नावाच्या ना-नफा तत्वावर काम करत असलेल्या संस्थेसोबत काम करत असून, ते कार्बन मॅपर सॅटेलाईटची (Carbon MapperSatellite) निर्मिती करीत आहेत. हा उपग्रह कार्बन मॅपर मालिकेतील प्रथम उपग्रह असेल आणि 2023 मध्ये तो प्रक्षेपित करण्यात येईल. यात एक अत्याधुनिक इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर (Imaging Spectrometer)असेल, त्याद्वारे हवेतील प्रदुषकांच्या अणूची विशिष्ट रचना ओळखण्यासाठी शेकडो विविध रंगांमध्ये फोटोज (Images)घेतले जातील. याचा वापर करणाऱ्या जेट प्रोपलशन प्रयोगशाळेच्या (Jet Propulsion Laboratory) म्हणण्यानुसार, याद्वारे अवकाशातून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडचे पॉईंट सोर्स मोजले जातील. दिलासादायक! सोमवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 2764 जणांचा मृत्यू दरवर्षी जागतिक प्रदुषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कार्बन मॅपर उपग्रहाद्वारे संकलित केलेला सर्व डेटा सार्वजनिक (Public)केला जाईल. यामध्ये देश, उद्योग आणि कंपन्यांचा डेटा देखील असेल. जेपीएलच्या पृथ्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान संचलनालयाचे संचालक जेम्स ग्राफ यांनी सांगितले की जेपीएल हरितगृह वायू आणि पृथ्वीच्या हवामानाच्या भविष्याविषयी संशोधन सुरु करण्यास उत्सुक आहे. या संशोधनातून या विषयांबाबत अधिक गंभीर माहिती समोर येईल. कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी 'हा' स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण? कार्बन मॅपरचे इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर पृथ्वीवरील प्रदुषण निर्माण करणाऱ्या स्त्रोतांचा शोध घेण्यास मदत करेल. या इमेजेसचा पिक्सेल आकार सुमारे 30 मीटर (98 फूट) असेल. कक्षेत सध्या असलेल्या अन्य इमेजिंग स्पेक्ट्रोमीटरचे पिक्सेल आकार मोठे आहेत. त्यामुळे जमिनीवरील नैसर्गिक वायूच्या पाईपलाईन्स खराब झालेली ठिकाणे किंवा अन्य सूक्ष्म गोष्टी शोधणंही शक्य होणार आहे. यातील उच्च-रेझोल्युशन इमेजेसमुळे (High Resolution Images) हरितगृह वायू नेमका कोठून उत्सर्जित होतोय, हे समजू शकेल. हे तंत्रज्ञान संशोधकांना गॅस उत्सर्जनाचे स्त्रोत ठोसपणे ओळखण्यास,अभ्यास करण्यास, त्याचे प्रमाणिकरण करण्यास उपयुक्त ठरेल, असे जेपीएलचे वैज्ञानिक चार्लस मिलर यांनी सांगितले. या कार्बन मॅपरमध्ये कॅलिफोर्निया राज्य, प्लॅनेट,अॅरिझोना युनिव्हर्सिटी, अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, हाय टाईड फाऊंडेशन आणि आरएमआय हे भागीदार आहेत.
First published:

Tags: Nasa

पुढील बातम्या