टोक्यो, 23 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) सध्या जपानच्या दौऱ्यावर
(Modi Japan Visit) आहेत. क्वाड शिखर संमेलनात
(Quad Conference) सहभागी होण्यासाठी ते येथे आले आहेत. टोकियोला पोहोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये परदेशी भारतीय तसेच जपानी नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
(PM Modi in Tokyo) यावेळी पंतप्रधान मोदींनी एका जपानी मुलाशीही संवाद साधला. त्याचा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.
नेमकं काय घडलं -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना एका जपानी मुलाने हिंदीत भाषण केले.
(Japan Boy Speak in Hindi) जपानी मुलाला हिंदी बोलताना पंतप्रधानांनी ऐकले तेव्हा ते थक्कच झाले.
(Japan Boy Spoke Hindi in front of PM Modi) यावर पीएम मोदींनी या मुलाला विचारले, वाह! तुम्ही हिंदी कुठून शिकलात? तुम्ही तर हिंदी फार छान बोलता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जपानी मुलाशी केलेल्या संवादाचा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून (आज) सुरू होणाऱ्या त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान क्वाड संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी टोकियोला भेट दिली आहे. सदस्य देशांमधील सहकार्याला चालना देणे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा करणे, हे क्वाडचे उद्दिष्ट आहे. पीएम मोदींशी संवाद साधणारी मुलं खूपच उत्साही दिसत होती. यावेळी मुलांनी पीएम मोदींचा ऑटोग्राफही घेतला. यासोबतच अनिवासी भारतीयांनीही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी 'भारत का शेर' म्हणजे 'भारताचा सिंह'चा नारा दिला.
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
हेही वाचा - Quad Summit: 40 तासांचा जपान दौरा, PM मोदी 23 कार्यक्रमात होणार सहभागी; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासाठी रात्रीचीच वेळ का निवडतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास सर्व देशांच्या दौऱ्यांमध्ये एक पॅटर्न दिसून येतो. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांसाठीच्या प्रवासासाठी रात्रीची वेळ निवडतात. यामागे एक मोठे कारण आहे, ते म्हणजे पंतप्रधान मोदी हे जास्तीत जास्त आपल्या वेळेचा वापर करू इच्छितात. उपयुक्त कामासाठी दिवसाचा वेळ वाचवण्यासाठी ते परदेश दौऱ्यासाठी रात्री प्रवास करणे पसंत करतात. पंतप्रधानांच्या जवळच्या एका सूत्रांनी सांगितले की, वेळ आणि संसाधने वाचवणे ही त्यांची सवय बनली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.