नवी दिल्ली, 22 मे: परदेश दौऱ्यांमध्ये कमी वेळात अधिकाधिक सभा घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची प्रथा जपानमध्येही (Japan) कायम राहणार आहे. पंतप्रधान एकूण 40 तास जपानमध्ये असतील ज्या दरम्यान त्यांच्या 23 बैठका होणार आहेत. 24 मे रोजी क्वाड बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पीएम मोदी जपानला जात आहेत, जिथे ते अमेरिका (United States), जपान, ऑस्ट्रेलियाच्या (Japan and Australia) राष्ट्रप्रमुखांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत.
24 मे रोजी क्वाड शिखर परिषदेसाठी जपानमध्ये जवळपास 40 तासांच्या मुक्कामादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, ज्यात तीन जागतिक नेत्यांच्या भेटींचा समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसह टोकियो येथे क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, मोदी त्यांच्या दौऱ्यात व्यापार, राजनैतिक आणि समुदाय संवाद साधतील.
Vastu: आर्थिक तंगी घरात कधीच नाही होणार; वास्तुदोष घालवण्यासाठी ही एक गोष्ट घरात कायम ठेवा
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळेचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी, पंतप्रधानांच्या दौऱ्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते टोकियोमध्ये फक्त एक रात्र घालवतील, तर प्रस्थान आणि आगमन दरम्यान दोन रात्री विमानात घालवल्या जातील.
अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत द्विपक्षीय चर्चा होणार
गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रत्येक दौऱ्याची तयारी अशा प्रकारे केली आहे की, येण्या-जाण्यात लागणारा वेळ विमानातच जातो. पंतप्रधानांच्या व्यस्ततेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किसिडा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान यांच्यासोबत क्वाडच्या भेटी तसंच या राष्ट्राध्यक्षांशी वैयक्तिक द्विपक्षीय संवाद यांचा समावेश आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी तीन डझन जपानी कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेणार आहेत. यासोबतच जपानमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांशी त्यांच्या संवादाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे.
चार देशांचे प्रमुख नेते जागतिक मुद्द्यांवर विशेष चर्चा करणार
क्वाड समिटचा अधिक तपशील देताना, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या बैठकीमध्ये सर्वोच्च नेत्यांना इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या विकासावर आणि परस्पर हिताच्या समकालीन जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच चारही देशांचे प्रमुख नेते क्वाड इनिशिएटिव्ह आणि वर्किंग ग्रुपच्या प्रगतीचा आढावा घेतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.