वॉशिंग्टन, 22 एप्रिल : जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आहे. सर्वच देश कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी लॉकाडऊन केलं आहे. डॉक्टर्स, नर्स अहोरात्र कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, अशाच एका महिला डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय वंशाची डॉक्टर उमा राणी मधूसूदन यांचे स्थानिक लोकांनी आभार मानल्याचं दिसतं. साउथ विंडसर इथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या उमा या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 200 अमेरिकन नागरिकांना कोरोनाच्या तावडीतून वाचवलं आहे. त्यांच्या या कामाबद्दल स्थानिकांनी तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह आभार मानले. या वाहनांमध्ये ते लोक होते ज्यांच्यावर उमा यांनी उपचार केले होते. सर्वांनी हातात आभार मानणारे पोस्टर्स धरले होते.
In recognition of her extraordinary service treating Corona patients in South Windsor Hospital in the US , Dr Uma Madhusudan, a Mysore origin doctor honoured this way infront of her house in USA. You can see her recieving salute!! 👏🏼👏🏼 pic.twitter.com/ySn39SsdhW
— Adil hussain (@_AdilHussain) April 21, 2020
डॉक्टर उमा यांच्या घरासमोरून जाताना प्रत्येक गाडीने हॉर्न वाजवला. तिथंच पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्यांनीही सायरन वाजवला. डॉक्टर उमा यांनी घराच्या समोर उभा राहून सर्वांचे हे प्रेम स्वीकारले. लोकांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हे वाचा : मानलंच पाहिजे! ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी बिल गेट्स यांनी केलं मोदींचं कौतुक जगभरात आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून कोरोनापासून लोकांना वाचवत आहेत. यामुळे अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची सख्या 8 लाख 20 हजारांवर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 45 हजारांहून अधिक आहे. हे वाचा : विद्यार्थ्यांसाठी शिक्षक झाडावर, ऑनलाइन शिकवणीत येणाऱ्या अडथळ्यावर काढला मार्ग संकलन, संपादन - सूरज यादव