Home /News /national /

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक झाडावर, ऑनलाइन शिकवणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यावर असा काढला मार्ग

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक झाडावर, ऑनलाइन शिकवणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यावर असा काढला मार्ग

लॉकडाऊनमुळे सध्या शाळा, महाविद्यालयेसुद्धा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन क्लासही घेतले जात आहेत.

    कोलकाता, 22 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसमुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासही बंद ठेवण्यात आले आहेत. तर काही राज्यातील बोर्डाच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लासही घेतले जात आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. यातही एक ना अनेक अडचणी येतात. एका शिक्षकाला विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता. यामुळे ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आडथळा यायचा. यावर उपाय म्हणून त्या शिक्षकाने आपला मुक्काम झाडावर हलवला आहे. त्या झाडावर रेंज चांगली येत असल्यानं तिथंच बसण्यासाठी जागा तयार केली आहे. झाडावर बैठक तयार करून तिथून ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या शिक्षकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सुब्रत पाती हे पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या एका शिक्षण संस्थेमध्ये इतिहास विषय शिकवतात. बांकुरा जिल्ह्यातील अहांदा गावात लॉकडाऊनमुळे ते अडकले आहेत. त्यामुळे रोज क्लास कसा घ्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवावं तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर त्यांना एक युक्ती सुचली. आपल्या मित्रांच्या मदतीनं त्यांनी झाडावर रेंज येईल अशा ठिकाणी बैठक तयार केली आणि तिथून विद्यार्थ्यांना शिकवू लागले. हे वाचा : कोरोनाग्रस्तांची सेवा करताना मृत्यू, डॉक्टरची अखेरची इच्छाही राहिली अधुरी रोज ठरलेल्या वेळेत ते या झाडावर येऊन पोहोचतात आणि क्लास सुरू करतात. हे झाड दूर असल्यानं वेळ जाऊ नये म्हणून ते जेवण-पाणी सगळं आपल्या सोबत झाडावर घेऊन येतात. अशा परिस्थित त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतानाही विद्यार्थ्यांसाठी सर्व करत आहेत. त्यांच्या या ऑनलाईन क्लासला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे असं सुब्रत यांचं म्हणणं आहे. हे वाचा : 'तुम्ही घरी येणार ना?' मृत्यूच्या काही तासांआधी लेकीनं बाबांकडून घेतलं वचन पण...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या