Home /News /national /

तुम्हाला मानलंच पाहिजे! ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी बिल गेट्स यांनी केलं PM मोदींचं कौतुक

तुम्हाला मानलंच पाहिजे! ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी बिल गेट्स यांनी केलं PM मोदींचं कौतुक

'मोदी सरकार फक्त लॉकडाऊन करूनच थांबलं नाही तर त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आरोग्य यंत्रणा मजबूत केली.'

    नवी दिल्ली 22 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्ही तत्परतेने आणि धाडसाने निर्णय घेतले हे तुमच्या नेतृत्वाचं यश आहे. त्यासाठी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे असं कौतुक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं केलं आहे. गेट्स यांनी मोदी यांना पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं. जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत मोदीच अव्वल असल्याचं आजच एका अमेरिकन संस्थेनं म्हटलं आहे. त्या पाठोपाठ एकाच दिवसात मोदींचं दुसऱ्यांदा कौतुक झालं आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर भारतात काय होणार याकडे सगळ्या जगाचं लक्षं लागलं होतं. अफाट लोकसंख्या, साधन सामुग्रीचा अभाव यामुळे काय होणार याकडे सर्व जग लक्ष लावून बसलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि सगळा देश बंद झाला. भारतासारख्या मोठ्या देशाला लॉकडाऊनचा निर्णय घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबला गेला. त्याबद्दलच बिल गेट्स यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. मोदी सरकार फक्त लॉकडाऊन करूनच थांबलं नाही तर त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आरोग्य यंत्रणा मजबूत केली. आयसोलेशन विभाग निर्माण केले. त्याचबरोबर कोरोनाच्या संशोधनावरही बळ दिलं. या काळात सरकार आपल्या कामांमध्ये डिजिटल पद्धतीचा अतिशय उत्तम पद्धतीने वापर करत असल्याचंही बिल गेट्स यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महासंकटात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगातील सर्व बड्या नेत्यांना मागे सोडले आहे आणि ते आघाडीवर पोहोचले आहेत. आताच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार पीएम मोदी यांची लोकप्रियता 68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकप्रियता 3 टक्क्यांनी घटली आहे. अमेरिकेच्या ग्लोबल डेटा इटेंलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सनुसार 14 एप्रिलपर्यंत मोदींची रेटिंग 68 टक्के झाल्याची सांगितले, जी गेल्या वर्षी 62 टक्के इतकी होती. देशात 24 तासात 1 हजार 486 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांनी ओलांडला 20 हजारांचा टप्पा पीएम मोदी यांच्या रेटिंगमधील सुधारणा ही कोरोना व्हायरसविरोधात त्यांनी केलेली तयारी आणि निर्णयामुळे असल्याचे सांगितले जाते. त्यांनी 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर 14 एप्रिलला लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 3 मेपर्यंत करण्यात आली आहे. त्यांनी वैश्विक नेत्यांना या आजाराशी सामना करण्यासाठी एकजूट करण्याचा प्रयत्न केला. जगाला हादरविणाऱ्या व्हायरसचे आहेत 30 प्रकार, असा आहे भारतातला कोरोना याशिवाय सार्क देशांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकी घेतल्या आणि जी 20 देशांची बैठक करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढत आहे. याशिवाय त्यांनी आवश्यक औषधांवर निर्बंध हटवून मदतीसाठी जगभरातील अनेक देशांना निर्यात केला, या कारणांमुळे मोदींच्या लोकप्रियतेच्या टक्क्यांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या