मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचं नेतृत्त्व मुल्ला बरादर यांच्याकडे, तालिबानी सुत्रांची माहिती

अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचं नेतृत्त्व मुल्ला बरादर यांच्याकडे, तालिबानी सुत्रांची माहिती

अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली आहे.

अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली आहे.

अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 03 सप्टेंबर: अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली आहे. अफगाणिस्तानमधील किमान तीन तालिबानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख मुल्ला बरादर (Mullah Abdul Ghani Baradar)अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे नेतृत्व करतील.

तालिबानच्या सूत्रांच्या हवाल्याने अल-अरेबिया न्यूजच्या बातमीनुसार, मुल्ला बरदार यांना अफगाणिस्तानच्या नवीन सरकारची कमान मिळाली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, तालिबानचे दिवंगत संस्थापक मुल्ला उमर यांचे पुत्र मुल्ला मोहम्मद याकूब आणि शेर मोहम्मद अब्बास स्टेनिकझाई हे सरकारमध्ये वरिष्ठ पदावर असतील. तालिबानच्या सह-संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरदारला 2010 मध्ये दक्षिण पाकिस्तानच्या कराची शहरात सुरक्षा दलांनी पकडलं होतं आणि त्यानंतर 2018 मध्ये सोडून दिलं.

शुक्रवारी नमाजानंतर होणार तालिबान सरकारची घोषणा? असं असेल स्वरूप

परदेशी मान्यतेची आस

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे अगोदरच देश सोडून निघून गेलेले आहेत. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्याची तांत्रिक अडचण दूर झाल्याचं मानलं जात आहे. तालिबानच्या सरकारला जगातील सर्व देशांनी मान्यता द्यावी, यासाठी तालिबानचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप अमेरिकेसह कुठल्याही देशाने या सरकारला मान्यता दिलेली नाही. सरकारच्या स्थापनेनंतर जागतिक निकषांवर ते सरकार टिकतं का आणि काही मूलभूत बाबींचं पालन केलं जातं का, याची खातरजमा करूनच सरकारला मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पंजशीरचा पेच

पंजशीर अद्यापही तालिबानच्या ताब्यात आलेलं नसल्यामुळे त्याबाबत नेमकं काय धोरण निश्चित करायचं, याबाबत तालिबानी नेत्यांमध्ये खल सुरू आहे. एकीकडे पंजशीरवर तालिबानकडून हल्ले चढवले जात असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत तालिबानी नेते चर्चादेखील करत आहेत. सरकार स्थापन करण्याची घोषणा करतानाच तालिबानला पंजशीरबाबतचं आपलं धोरणही जाहीर करावं लागणार आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban