मराठी बातम्या /बातम्या /विदेश /लेक आणि नातीसाठी आईची तळमळ; अफगणिस्तानमधून परत आणण्यासाठी भारत सरकारला आर्त हाक

लेक आणि नातीसाठी आईची तळमळ; अफगणिस्तानमधून परत आणण्यासाठी भारत सरकारला आर्त हाक

आता या परिस्थितीत बिंदू संपत यांनी पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या आणि नातीच्या सुटकेसाठी सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत.

आता या परिस्थितीत बिंदू संपत यांनी पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या आणि नातीच्या सुटकेसाठी सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत.

आता या परिस्थितीत बिंदू संपत यांनी पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या आणि नातीच्या सुटकेसाठी सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत.

  काबुल, 19 ऑगस्ट : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा मिळवल्यानंतर तिथं एकच हाहाकार माजला असून लाखो लोक देश सोडून जाण्याची धडपड करत आहेत. काबूल विमानतळावर हजारो लोकांनी गर्दी केली आहे. अनेक भारतीयही अफगाणिस्तानात अडकले असून, त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर तिथे अडकलेल्या लोकांच्या वाटेकडे त्यांचे कुटुंबीय, जिवलग डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत एका आईनं (Mother) आपल्या मुलीला आणि नातीला परत आणण्यासाठी भारत सरकारकडं (Indian Government) मदतीची याचना केली आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  या आईचं नाव आहे बिंदू संपत (Bindu Sampat). त्या केरळमध्ये (Kerala) राहतात. त्यांची मुलगी निमिषा (Nimisha ) 2017मध्ये इसिसमध्ये (ISISIS) सामील होण्यासाठी केरळमधून पळून गेली होती. तेव्हा निमिषा तिरुअनंतपुरम येथील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती. तेव्हा एक डॉक्टर आणि काही दहशतवाद्यांनी तिचं ब्रेन वॉशिंग (Brain Washing) करून तिला इसिसमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केलं. तेव्हा इसिसमध्ये सामील होण्यासाठी केरळमधून 17 लोक बेपत्ता झाले होते. अब्दुर रशीद आणि इतर चार जण याचे मास्टरमाईंड होते.

  2017 -19 या दोन वर्षांच्या काळात केरळमध्ये इसिसबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं. या काळात जवळपास 149 लोक इसिसमध्ये सामील झाले होते. त्यापैकी 100 लोक आपल्या कुटुंबासह देश सोडून गेले होते. त्यापैकी 32 लोकांना अरब देशांमध्ये अटक करण्यात आलं, आणि 6 महिने तुरुंगात ठेवून नंतर भारतात परत पाठवण्यात आलं होतं.

  2019 मध्ये निमिषानं आणि इसिसशी संबंधित 400 जणांनी अफगाण सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर निमिषा फातिमा काबूलच्या तुरुंगात (Kabul Jail) शिक्षा भोगत होती. तिच्यासोबत तिची पाच वर्षांची मुलगीही (Five Years Old Daughter) आहे. तिचा पती अमेरिकेनं इसिसच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला होता.

  हे ही वाचा-Video: ''आम्हाला बाहेर काढा, तालिबान मारुन टाकेल'', लहानग्या मुलीचा आक्रोश

  दरम्यान, तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यानंतर शेकडो कैद्यांची तुरुंगातून सुटका केली अशी बातमी आली होती, त्यामुळे बिंदू संपत यांना खूप आनंद झाला. मात्र संध्याकाळी कैद्यांना सोडण्यात आलं नसल्याची बातमी आल्यानं आपली मुलगी आणि नात तालिबान्यांच्या तावडीत सापडतील अशी भीती त्यांना सतावत आहे. भारत सरकारनं (Indian Government) आपली मुलगी आणि नात यांना अफगाणिस्तानातून परत आणावं असं साकडं त्यांनी सरकारला घातलं आहे. आपली पाच वर्षांची कोवळी नात तालिबान्यांच्या हातात पडू नये, अशी त्यांची इच्छा आहे.

  ‘आपल्या मुलीनं देशद्रोह केला असेल तर त्याची भारतीय कायद्यानुसार तिला शिक्षा व्हावी, पण तिला आणि तिच्या मुलीला भारतात येऊ द्यावं. त्यांना अफगाणिस्तानातून भारतात आणलं तर आपण त्यांची काळजी घेऊ. आपली नात सुरक्षित राहील, अशी मागणी आपण भारत सरकारकडं गेल्या चार वर्षांपासून करत आहोत, पण सरकार त्यासाठी परवानगी का देत नाही हे कळत नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  आता या परिस्थितीत बिंदू संपत यांनी पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या आणि नातीच्या सुटकेसाठी सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत.

  First published:

  Tags: Crime news, Kerala, Taliban