मराठी बातम्या /बातम्या /विदेश /''आम्हाला इथून बाहेर काढा, तालिबान मारुन टाकेल'', रडत-रडत लहान मुलीची अमेरिकी सैन्याकडे विनंती, Watch Video

''आम्हाला इथून बाहेर काढा, तालिबान मारुन टाकेल'', रडत-रडत लहान मुलीची अमेरिकी सैन्याकडे विनंती, Watch Video

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban)कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

काबूल, 19 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban)कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. काबूल विमानतळावरील (Kabul Airport) फोटो भयानक आहेत. नागरिकांना कसही करुन देशातून बाहेर पडायचं आहे. तालिबानसोबत राहणे कठीण असल्याचं म्हणणं अफगाणिस्तानमधल्या नागरिकांचं आहे. दरम्यान तालिबान म्हणत आहे की, महिलांना शिक्षण आणि कामाचे स्वातंत्र्य दिले जाईल. अर्थात, बुरखा घालू नका पण हिजाब घालावा लागेल. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक लहानगी अमेरिकी सैन्याला विनंती करत आहे. या व्हिडिओत ती लहान मुलगी बोलत आहे की, आम्हाला इथून बाहेर काढा, तालिबान मारून टाकेल.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी रडत विनंती करत आहे. हा व्हिडिओ अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करणारे एक स्वतंत्र पत्रकार हिजबुल्ला खान यांनी ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. जरी आम्ही या व्हिडिओची पुष्टी करू शकत नाही. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानची क्रूरता

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानची (Talibani) क्रूरता पुन्हा एकदा दिसू लागली आहे. काबूल (Kabul) न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी काबूल विमानतळावर (Kabul Airport) पोहोचणाऱ्या लोकांना देश सोडू देत नाहीत. देश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर धारदार शस्त्रांनी (Attack) वार करत आहेत. त्यांच्यावर गोळीबार (Firing) केला जातो. याच दरम्यान काबूल विमानतळावर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

तालिबानची क्रूरता, लोकांवर भररस्त्यात हल्ला; काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार 

समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार अमेरिकन सैनिकांकडून करण्यात आला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी गोळीबार केला असल्याचं म्हटलं जात आहे. या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाल्याचं किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे.

बुधवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबूल विमानतळावर देश सोडण्याच्या उद्देशाने येणाऱ्या महिला आणि मुलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. विमानतळावरून जमावाला परत पाठवण्यासाठी तालिबानांनी गोळीबारही केला. लॉस एंजेलिस टाइम्सचे रिपोर्टर मार्कस याम यांनी ट्विटरवर काही फोटो ट्विट केले आहेत. यावेळी तालिबानच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban