• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • इबोला अन् कोरोनाहून प्राणघातक विषाणूचं जगावर संकट; मारबर्ग विषाणूबाबत WHO ने केलं सावध

इबोला अन् कोरोनाहून प्राणघातक विषाणूचं जगावर संकट; मारबर्ग विषाणूबाबत WHO ने केलं सावध

मारबर्ग हा विषाणू वटवाघळांद्वारे मनुष्यात पसरतो.

मारबर्ग हा विषाणू वटवाघळांद्वारे मनुष्यात पसरतो.

पश्चिम आफ्रिकेतील गिनी (Guinea) देशात घातक मारबर्ग विषाणूचा (Marburg Virus) पहिला रुग्ण आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही याची पुष्टी (WHO Confirmed Marburg Virus) केली आहे.

 • Share this:
  जिनिव्हा, 10 ऑगस्ट: मागील जवळपास दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या साथीशी (Corona Pandemic) लढा देत आहे. कोरोना विषाणूचा धोका कमी झाला नाही, तोपर्यंत एक नवीन धोका निर्माण झाला आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनी (Guinea) देशात घातक मारबर्ग विषाणूचा (Marburg Virus) पहिला रुग्ण आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही याची पुष्टी (WHO Confirmed Marburg Virus) केली आहे. मारबर्ग हा विषाणू इबोला आणि कोरोनापेक्षा अधिक धोकादायक मानला जातो. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गिनीतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे की, मारबर्ग हा विषाणू वटवाघळांद्वारे मनुष्यात पसरतो. या विषाणूचा मृत्यूदर तब्बल 88 टक्के इतका आहे, यावरून हा विषाणू किती घातक आहे? याचा अंदाज लावला जाऊ शकतो. संबंधित मारबर्ग रुग्णाचा 2 ऑगस्ट रोजी दक्षिणेतील गुएकेडो प्रांतात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत हा विषाणू आढळला आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू इबोला विषाणूमुळे झाला असावा, असा अंदाज होता. मात्र संबंधित रुग्णाच्या शरीरात मारबर्ग विषाणू आढळला आहे. हेही वाचा-Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास खरंतर, दोन महिन्यांपूर्वी इबोला विषाणूचा अंत झाल्याची घोषणा डब्ल्यूएचओकडून करण्यात आली होती. त्यानंतर गिनीमध्ये मारबर्ग हा इबोलापेक्षा अधिक प्राणघातक विषाणू सापडला आहे. गेल्या वर्षी, याठिकाणी इबोला विषाणूची साथ सुरू झाली होती. ज्यामध्ये 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचवेळी, या विषाणूच्या धोक्याबाबत WHO नं म्हटले होतं की, या विषाणूचा धोका प्रादेशिक पातळीवर अधिक आहे, तर जागतिक स्तरावर कमी आहे. हेही वाचा-डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग विषाणू एकदा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर, रुग्णाच्या शरीरातून बाहेर पडणारा द्रव्य पदार्थ दूषित पृष्ठभाग आणि पदार्थांच्या संपर्कात येऊन रुग्णाला अनेक पटीनं संक्रमित करतो. संबंधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळाला नाही, तर संबंधित रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते.
  Published by:News18 Desk
  First published: