Home /News /coronavirus-latest-news /

Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास

Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास

Covishield आणि Covaxin या दोन लशीचा मिक्स डोस कितपत प्रभावी आहे, याबाबत ICMR महत्त्वाचं संशोधन केलं आहे.

Covishield आणि Covaxin या दोन लशीचा मिक्स डोस कितपत प्रभावी आहे, याबाबत ICMR महत्त्वाचं संशोधन केलं आहे.

Corona Vaccination in India: Covishield आणि Covaxin या दोन लशीचा मिक्स डोस कितपत प्रभावी आहे, याबाबत ICMR महत्त्वाचं संशोधन केलं आहे.

  नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: मागील दीड वर्षांपासून जगभर कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूमध्ये सातत्यानं होणारा बदल जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिअंट (Corona virus new Variant) शरीरात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला सहजपणे चकमा देऊ शकतात, असंही अनेक संशोधनात (Research) म्हटलं आहे. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने शास्त्रज्ञ विविध उपायांचा पाठपुरावा करत आहेत. या दिशेनं संशोधन केल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मिक्स-अँड-मॅच लस (Mix and match vaccine) द्यायला सुरुवात केली आहे. दोन वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकार शक्ती आणखी मजबूत होत असल्याचा दावा विदेशात झालेल्या संशोधनात करण्यात आला आहे. हेही वाचा-मोठी बातमी! आता घ्यावा लागणार एकच डोस,Johnson & Johnson च्या Corona लशीला मंजुरी भारतानंही याच दिशेनं एक पाऊल उचललं असून मिक्स-अँड-मॅच लसीकरणाच्या परिणाम जाणून घेण्यासाठी एक संशोधन केलं आहे. याबाबतची माहिती इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) दिली आहे. आयसीएमआरनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅसीनचा मिश्रित डोस घेतल्यानंतर शरीरात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅसीन या दोन लशीचे वेगवेगळे डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत केली जाऊ शकते, असा दावा संबंधित निवेदनात करण्यात आला आहे. हेही वाचा-अरे देवा! Delta नंतर आता Eta variant, पहिला रुग्ण सापडला; किती भयंकर हा कोरोना? मिक्स-अँड-मॅच लस कितपत प्रभावी ICMR ने सांगितलं की, संशोधकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही स्वदेशी लशी एकत्रित करत त्यावर अभ्यास केला आहे. अशा पद्धतीची मिक्स-अँड-मॅच लस केवळ सुरक्षितच नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असं निवेदनात म्हटलं आहे. असं असलं तरी सध्या भारताच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार, ज्या कंपनीच्या लशीचा पहिला डोस घेण्यात आला आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Corona updates, Corona vaccine

  पुढील बातम्या