मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत

डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत

Corona Virus New Variant:कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिअंट (Delta Variant) सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक प्राणघातक विषाणू येऊ शकतो का? याबाबत महत्त्वाचा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: कोरोना विषाणूनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूचा उद्भाव झाल्यापासून विषाणू सातत्यानं आपल्या रुपात बदल (Corona virus new variant) करत आहे. कोरोना विषाणूची नवीन रुपं अधिकाधिक घातक ठरत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Corona virus 2nd wave) उद्भवलेला डेल्टा व्हेरिअंट (Delta Variant) सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक प्राणघातक विषाणू येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या व्हेरिअंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन (Research) झालं नाही. पण हा विषाणू सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे.

कोरोना  विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिअंट समोर आला आहे. डेल्टा व्हेरिअंटच्या धोक्याबद्दल फारसं जागरूक नसलेल्या भारतीय समाजात हा विषाणूनं वेगानं पसरला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिअंट इतर व्हेरिअंटच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत, शिवाय डेल्टा व्हेरिअंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.

हेही वाचा-अरे देवा! Delta नंतर आता Eta variant, पहिला रुग्ण सापडला; किती भयंकर हा कोरोना?

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिअंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा विषाणू लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा विषाणू हा कोरोना विषाणूच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे. लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये जितका "व्हायरल लोड"  आहे, तितकाच 'व्हायरल लोड' लस घेतलेल्या नागरिकांमध्ये आढळला आहे. पण यावर अद्याप संशोधन पूर्ण झालं नाही.

हेही वाचा-Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास

शास्त्रज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिअंटमध्येही बदल होणं शक्य आहे. कारण डेल्टा प्लस हा व्हेरिअंटदेखील डेल्टापासून तयार झाला आहे. सर्वाधिक प्राणघातक असणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटची उत्त्पती जूनमध्ये भारतात झाली आहे. त्यानंतर या व्हेरिअंटला प्राणघातक व्हेरिअंट म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. यानंतर लॅम्ब्डा आणि B.1.621 हे व्हेरिअंट देखील आले आहेत. त्यामुळे येत्या काळात डेल्हा व्हेरिअंटहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येण्याची शक्यता आहे. व्यापक प्रमाणात लसीकरण केल्यानं मृत्यूदर कमी केला जाऊ शकतो, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates