नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : माऊंटन ड्यू (Mountain Dew) प्रकरणात पेप्सीकोला मोठा झटका बसला आहे. Mountain Dew या नावासाठी सुरू असणारी कायदेशीर लढाई पेप्सीको (Pepsico) हरली असून, आता बेव्हरेज कंपीन असणाऱ्या MagFastला आता कायदेशीर पद्धतीने ट्रेडमार्क 'माऊंटन ड्यू'चा वापर करण्याची परवानगी मिळाली आहे. जाणकारांच्या मते आता माऊंटन ड्यू या नावावर आता पेप्सीकोचा एकाधिकार नसेल. MagFast चे चेअरमन यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ही केस ते गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच जिंकले होते, पण त्यांना अजूनपर्यंत कायदेशीर कागदपत्रे मिळणे बाकी होतं. त्यांनी पेप्सीकोकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे, कारण 2004 मध्ये पेप्सीकोने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले होते की, जर ते MagFast विरोधातील केस हरले तर ते संपूर्ण भरपाई देतील.
काय आहे प्रकरण?
पेये उत्पादक मॅगफास्टने ट्रेडमार्क माऊंटन ड्यू च्या वापरासाठी पेप्सीकोचा कायदेशीर पराभव केला आहे. 'माउंटन ड्यू' हा ट्रेडमार्क वापरण्यासाठी आता मॅगफास्ट बेव्हरेज कंपनीला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.
(हे वाचा-नोटांमधून देखील पसरू शकतो कोरोना, RBI ने सांगितले महत्त्वाचे उपाय)
हैदराबाद स्थित मॅगफास्ट बेव्हरेजेसचे अध्यक्ष सय्यद गाझीउद्दीन यांनी माध्यमांना सांगितले की 2000 मध्ये त्यांनी 'माउंटन ड्यू' नावाच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची विक्री करण्यास सुरवात केली. यानंतर 2003 मध्ये पेप्सीकोने याच नावाचे सॉफ्ट ड्रिंक लाँच केले.
(हे वाचा-15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)
त्यांनी असे सांगितले की, पेप्सीकोने स्वतःच त्यांच्या नावाचा अवैध वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या कायदेशीर लढाईत दिल्ली हायकोर्टापासून सर्व न्यायालयांनी मॅगफास्ट बेव्हरेजच्या बाजूने निकाल दिला होता. त्याने सांगितले की हा लढा सुमारे 15 वर्षे चालला आणि शेवटी ते जिंकला. न्यायालयाकडून पेप्सीकोने केलेले सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money