मराठी बातम्या /बातम्या /Viral /ना बैल, ना ट्रॅक्टर, पठ्ठ्याने बाईकनेच नांगरलं शेत; कसं ते पाहा VIDEO

ना बैल, ना ट्रॅक्टर, पठ्ठ्याने बाईकनेच नांगरलं शेत; कसं ते पाहा VIDEO

शेतीसाठी सॉलिड देशी जुगाड.

शेतीसाठी सॉलिड देशी जुगाड.

शेतीसाठी सॉलिड देशी जुगाड.

मुंबई, 30 सप्टेंबर : भारत देश हा कृषिप्रधान (Farmer) देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत (Farmer desi jugaad video). शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने.

एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. पण शेतीसाठी केलेला हा देशी जुगाड (Desi Jugaad Video) सर्वांना आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

आता तुम्ही म्हणाल बाईकने नांगरणी कशी बरं करता येईल. तर हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओत पाहू शकता, या तरुणाने आपल्या बाईकच्या मागील दोन चाकांना एक छोटा नांगर जोडला आहे. जसं तो शेतात बाईक चालवतो तसतसं नांगरही पुढे जातं आणि अगदी कोणत्याही मेहनतीशिवाय शेत नांगरलं जातं. jugaadu_life_hacks इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा - What an idea! एका फटक्यात UPSC Cleared; अजब ट्रिक सोशल मीडियावर Viral

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील एका तरुणानेही शेतकऱ्यासाठी काढलेल्या जुगाडाची बातमी समोर आली होती.  झाबुआ (Jhabua) गावात राहणाऱ्या 21 वर्षांच्या रोहित पटेल (Rohit Patel) या युवकाने कांदा साठवणुकीसाठी एक उत्तम तोडगा काढलेला आहे.  द बेटर इंडिया या हिंदी वेबसाइटने एक व्हिडिओ शेअर करत रोहित पटेलने केलेल्या तोडग्याबाबतची माहिती दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की रोहितने उन्हाळ्यात तयार झालेल्या कांद्यांची कोल्ड स्टोरेजशिवाय कशाप्रकारे साठवणूक (Stored) केलेली आहे.

हे वाचा - VIDEO - महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण

त्याने खिडकी नसलेल्या एका खोलीत जमीनीपासून 8 इंचावर वीटा रचून त्यावर लोखंडाची जाळी बसवली. व त्या जाळीच्या वर कांद्यांची साठवणूक केली आहे. त्या लोखंडाच्या जाळीवर एक एक्झॉस्ट फॅन (Exhaust fan) लावून कांद्यांना खालून हवा लागण्याची सोयही केलेली आहे. ज्यामुळे कांदे सडणार नाहीत आणि काही महिन्यांपर्यंत टिकतील.

First published:

Tags: Farmer, Viral, Viral videos