जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / चर्चमधल्या कार्यक्रमाने फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब? 'या' देशात 3500 लोकांचा मृत्यू

चर्चमधल्या कार्यक्रमाने फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब? 'या' देशात 3500 लोकांचा मृत्यू

चर्चमधल्या कार्यक्रमाने फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब? 'या' देशात 3500 लोकांचा मृत्यू

अमेरिका, इटली आणि ब्रिटनप्रमाणे फ्रान्समध्ये मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस, 01 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगात आतापर्यंत 42 हजार 322 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 8 लाख 59 हजार 032 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीननंतर अमेरिका आणि युरोपात परिस्थिती वाईट आहे. अमेरिका, इटली आणि ब्रिटनप्रमाणे फ्रान्समध्ये मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासात 418 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह येथील मृतांचा आकडा 3 हजार 516 झाला आहे. तर, 51 हजार 487 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्रान्समधील एका चर्चमध्ये झालेल्या धार्मिक प्रार्थनेनंतर कोरोनाचा प्रसार वाढला. फ्रान्सच्या उत्तरेकडील म्यूलहाऊस येथील एका प्रतिष्ठित चर्चमध्ये काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील भाविक या धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते. 18 फेब्रुवारी रोजी चर्चमध्ये आयोजित कार्यक्रमास हजारो लोकांनी हजेरी लावली होती. सुमारे पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात शेकडो भाविक युरोप, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देशातून आले होते. असे मानले जाते की चर्चमध्ये जमा झालेल्या गर्दीनंतर ‘कोरोना टाईम बॉम्ब’ बनून देशाच्या विविध भागात पसरत आहे. वाचा- बापरे! Coronavirus ने लहान मुलांनाही बनवलं आपलं शिकार, 2 रुग्णांचा मृत्यू असा पसरला फ्रान्समध्ये कोरोना असे सांगितले जात आहे की, म्यूलहाऊस येथील कार्यक्रमात हजारो किमी अंतरावरून कोणीतरी कोरोनाग्रस्त रुग्ण सामिल झाला होता. त्यामुळं संपूर्ण फ्रान्स देशात कोरोनाची लागण झाली आहे. फक्त फ्रान्सच नाही तर इत देशांमध्येही कोरोना पसरला. स्थानिक प्रशासनाचा असा विश्वास आहे की, या कार्यक्रमामुळे कोरोनाविषाणून फ्रान्समधील ऑटोमेकरच्या कार्यशाळेपासून पश्चिम आफ्रिका देश आणि लॅटिन अमेरिकन देशात पोहचला. वाचा- दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कार्यक्रमात सामिल झालेल्या 17 लोकांचा कोरोनाने मृत्यू रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चमधील कार्यक्रमात सामिल झालेल्या 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, 2500 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. खरं तर, 29 फेब्रुवारीला जेव्हा कोरोना पॉझिटिव्हची पहिली घटना समोर आली तेव्हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचे कनेक्शन चर्चच्या प्रार्थनेतून बाहेर आले. ज्यानंतर स्थानिक आरोग्य विभागाला कळले की कोव्हिड-19 या आजाराला समजण्यात चूक झाली आहे. नॅशनल पब्लिक हेल्थ फ्रान्सचे डॉ. मिशेल व्हेर्न म्हणतात की, ‘आम्हाला वाटलं की आमच्यासमोर टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता’. आता संसर्ग रोखण्यासाठी फ्रेंच सरकार लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करीत आहे. मात्र पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर सरकारने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्याचा फटका आता फ्रान्सला बसला आहे. वाचा- अखेर कोरोनाला मारण्याचा उपाय सापडला! WHO करणार शेवटची तपासणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात