जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / बापरे! Coronavirus ने लहान मुलांनाही बनवलं आपलं शिकार, 2 रुग्णांचा मृत्यू

बापरे! Coronavirus ने लहान मुलांनाही बनवलं आपलं शिकार, 2 रुग्णांचा मृत्यू

 गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

यूकेमध्ये (UK) 13 वर्षीय मुलाचा तर बेल्जिअममध्ये (Belgium) 12 वर्षीय मुलीचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 1 एप्रिल : आतापर्यंत वयस्कर व्यक्तींवर हल्ला करणारा कोरोनाव्हायरस (Coronavirus) आता महाभयंकर झाला आहे. फक्त वृद्धच नव्हे तर तरुण आणि आता लहान मुलांनाही (children) या विषाणूने आपलं शिकार बनवलं आहे. 12 आणि 13 वर्षीय मुलांचा या व्हायरसने जीव घेतला आहे. यूकेमध्ये (UK) 13 वर्षीय मुलाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ( King’s College Hospita) या मुलावर उपचार सुरू होते. रुग्णालय प्रशासन आणि मुलाच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा समस्या नव्हती. ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं मानलं जातं आहे.

जाहिरात

या मुलाला श्वास घेण्यात समस्या जाणवत होती, कोरोनाव्हायरसची लक्षणं त्याच्यामध्ये दिसू लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केल्याचं त्याच्या कुटुंबानं सांगितलं. याआधी मंगळवारी बेल्जिअममध्येही 12 वर्षीय मुलीचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला. युरोपमधील कोरोनाव्हायरसचा बळी ठरलेली ही सर्वात कमी वयाची रुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. बेल्जिअमच्या (Belgium) आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्तांनी सीएनएनला अशी माहिती दिली आहे. सीएनएनने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं होतं. हे वाचा -  धक्कादायक! 25 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू, भारतात व्हायरसचा सर्वात तरुण बळी किंग्ज कॉलेजमधील नॅथेलाइ मॅकडेरमॉट म्हणाल्या, “वयसस्कर व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाव्हायरचा धोका कमी आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र या प्रकरणानंतर आपल्याला आता अधिकच सावध राहण्याची गरज आहे. व्हायरस जास्त पसरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे यातून स्पष्ट होतं. मंगळवारी ब्रिटनमध्ये 24 तासांत कोरोनाव्हायरसमुळे 381 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. देशात एकाच दिवसात मृत्यू झालेला हा सर्वाधिक आकडा आहे. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 1,789 झाली आहे” जगभरात कोरोनाव्हायरसची 8,57,957 प्रकरणं आहेत. तब्बल 42,139 रुग्णांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. हे वाचा -  Coronavirus : लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात