लंडन 17 जून: कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. जगातले 195 पेक्षा जास्त देश या आजाराने त्रस्त आहेत. त्यावर अजुन औषध निघालेलं नसल्याने सर्व जग चिंताग्रस्त आहे. कोरोना पेशंटच्या उपचारासाठी आणि व्हायरसपासून बचावासाठी जगभर पीपीई किट आणि मास्कचा वापर होत आहे. सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ याचा वापर करत असल्याने त्याचा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. तो समुद्रात जात असून त्यामुळे माशांना आणि समुद्रालाच मोठा धोका निर्माण झाला आहे.
Theguardianने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यातला मोठ्या प्रमाणातला कचरा समुद्रात जात असतो. पीपीई किट्स तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरलं जात असल्याने ते किमान 450 वर्ष नष्ट होत नाही असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय. तर मास्क हे समुद्रात तरंगत असून मासे ते खात आहेत. त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
तर पीपीई किटमुळे व्हायरस समुद्रात नेमके काय बदल करतो किंवा समुद्रातल्या जीवसृष्टीवर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत.
WHOने केलेल्या दाव्यानुसार जगभरात दर महिन्यात 8 कोटी हँड ग्लोज, 16 लाख मेडिकल गॉगल्स 9 कोटी मेडिकल मास्क वापरले जातात. त्याचबरोबर कोट्यवधी पीपीई किट्सचाही वापर होत आहे. याचा प्रचंड कचरा तयार होत असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही असंही WHOने म्हटलं आहे.
हेही वाचा -
...तर येत्या 21 जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य
कोरोनामुक्त देशात पुन्हा घुसला कोरोना! एका अंत्यविधीनं वाढवली चिंता