मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शांतताप्रिय न्यूझीलंडमधून धक्कादायक बातमी! भारतीय दाम्पत्याचा ऑकलंडमध्ये भोसकून खून

शांतताप्रिय न्यूझीलंडमधून धक्कादायक बातमी! भारतीय दाम्पत्याचा ऑकलंडमध्ये भोसकून खून

काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आशियायी विशेषतः भारतीय व्यक्तींवर वर्णद्वेषातून हल्ले होत होते. हा त्याच प्रकारचा हल्ला आहे की काही घरगुती वैमनस्यातून या दांपत्याला संपवण्यात आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मंगळुरू, 1 एप्रिल : मूळच्या कर्नाटकातल्या (Karnataka) मंगळुरू इथल्या असलेल्या एका दाम्पत्याला भोसकून ठार (mangluru couple Stabbed to death new zealand) करण्यात आल्याची दुर्दैवी घटना न्यूझीलंडमधल्या (New Zealand) ऑकलंड (Auckland) इथे नुकतीच घडली. एलिझाबेथ बांगेरा (Elisabeth Bangera) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (Herman Bangera) अशी या दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. daijiworld ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बांगेरा दांपत्याचा इंजिनीअर झालेला मुलगा शील (Sheal) यालाही भोसकण्यात आलं असून, गंभीर जखमी असलेल्या स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याशिवाय चौथी एक व्यक्तीही किरकोळ जखमी झाली आहे. ही व्यक्ती रस्त्यावरून जात असताना घडत असलेल्या या प्रकाराला त्या व्यक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यामुळे ती व्यक्ती जखमी झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एलिझाबेथ यांचे वडील एडवर्ड अम्माण्णा हे मंगळुरू (Mangaluru) इथल्या बालमट्टा (Balmatta) परिसरातल्या शांती कॅथेड्रल (Shanti Cathedral) या संडे स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मर्कारा हिल चर्चमध्येही (Mercara Hill Church) त्यांना मोठा मान होता. हर्मन बांगेरा मुंबईतल्या एका शाळेत प्रशासक होते. एलिझाबेथ पूर्वी मुंबईत गोदरेज कंपनीत कामाला होत्या. त्यांनी हर्मन बांगेरा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर हे दाम्पत्य गोव्यात (Goa) स्थायिक झालं. मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी या दाम्पत्याने मुलासह न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ते तिकडे स्थायिक झाले. धक्कादायक! सात वर्षाच्या मुलावर बलात्काराचा आरोप, प्रकरण ऐकून न्यायाधीशही अवाक 2014मध्ये त्यांच्या मुलाने डिग्री सर्टिफिकेट मिळवल्याचा फोटो हर्मन यांनी फेसबुकवर अलीकडेच शेअर केला होता. ज्या कारणासाठी हे दाम्पत्य भारत सोडून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालं ते कारण पूर्ण झालं. मुलाला उच्च शिक्षणाची पदवी मिळाली याचा आनंदच त्यांनी फेसबुकवरून व्यक्त केला होता. असं सांगण्यात येत आहे, की गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्याचा मुलगा आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची इच्छा व्यक्त करत होता. तसंच, स्वतःच्या मर्जीने वागत होता. या मुद्द्यावरून आई-वडील आणि मुलामध्ये काही वादही झाल्याचं बोललं जात आहे. या गोष्टीचा खून होण्याशी काही संबंध आहे का, याचा तपास यंत्रणेतर्फे केला जाईलच; मात्र आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी एवढी धडपड केलेल्या या दाम्पत्याची अशी दुर्दैवी अखेर झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मुलगा दुखापतीतून बरा झाल्यानंतरच या प्रकरणातले काही धागेदोरे सापडू शकणार आहेत.
First published:

Tags: Murder, New zealnad

पुढील बातम्या