न्यूयॉर्क, 16 नोव्हेंबर: एका कारचालकाला (man dress up the car seat to look like person) कारमधील बाजूच्या सीटला जॅकेट आणि टोपी घातल्याचा मोठा भुर्दंड पडला आहे. ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी आपण हे केल्याची कबुली (Did to avoid traffic) त्याने पोलिसांना दिली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यासारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या असते. विशेषतः कार्यालयीन वेळात तर प्रत्येक चौकात ट्रॅफिक जॅम झाल्याचं बघायला मिळतं. काही वेळा ट्रॅफिक धीम्या गतीनं सुरू असतं. अशा परिस्थितीत कमी रहदारी असणारे मार्ग शोधून लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न अनेक चालक करत असतात.
View this post on Instagram
ट्रॅफिक टाळण्यासाठी केला उपाय
न्यूयॉर्क राज्यातील सफॉक काउंटी भागात ही घटना घडली. सफॉक काउंटी पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. ट्रफिक जॅममधून वाचण्यासाठी या इसमानं ड्रायव्हिंग सीटच्या शेजारील सीटला मानवी पोशाख चढवला. त्यावर जॅकेट घातलं आणि टोपीदेखील ठेवली. जणू काही शेजारच्या सीटवर एखादी व्यक्तीच बसली आहे, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न त्यानं केला. मात्र ड्युटीवर असणाऱ्या एका पोलिसाला हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे त्याने गाडी थांबवायला लावून तपासणी केली. त्यावेळी बाजूच्या सीटवर खरा माणूस नसून केवळ बनाव रचल्याचं लक्षात आलं.
हे वाचा- ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शरम वाटली पाहिजे!
यासाठी केला अट्टाहास
न्यूयॉर्क राज्यात वाहतुकीसाठी वेगवेगळ्या लेनचा वापर करण्यात येतो. एक लेन असते एचओव्ही लेन. याचाच अर्थ High Occupancy Lane. सार्वजनिक बस, कार पुलिंग किंवा एकापेक्षा अधिक प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही लेन असते. तर इतर 3 लेन या एकच व्यक्ती प्रवास करत असलेल्या कारसाठी असते. मात्र या लेनला प्रचंड गर्दी होत असल्याने लवकर पोहोचण्याच्या इराद्याने या व्यक्तीने एचओव्ही लाईनने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कमुळे त्याचं बिंग फुटलं. पावती फाडून त्याला पुन्हा तीन लेनमधून पोलिसांनी पाठवून दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Traffic Rules