स्वप्निलला कृष्णाच्या रुपात पाहून त्याची मुलं झाली अचंबित, हा 'बाबा' असल्याचा विश्वासच बसला नाही

स्वप्निलला कृष्णाच्या रुपात पाहून त्याची मुलं झाली अचंबित, हा 'बाबा' असल्याचा विश्वासच बसला नाही

उत्तर रामायणमध्ये लव तर श्री कृष्णामध्ये बालकृष्णाची भूमिका साकारणारा गोड स्वप्निल आजही अनेकांंच्या लक्षात आहे. मात्र त्याच्या मुलांना आज विश्वास होत नाही आहे की या दोन्ही भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे त्यांचे वडील आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 मे : लॉकडाऊनमध्ये 80 आणि 90 च्या दशकातील मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये काम करणारे कलाकार देखील प्रसिद्धीझोतात आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्वप्निल जोशी देखील (Swwapnil Joshi) त्याच्या 'उत्तर रामायण (Uttar Ramayan)' आणि 'श्री कृष्णा' (Shri Krishna) मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. या भूमिकांमुळे त्याला अभिनय क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान मिळालं होतं. त्यामुळे याबद्दल बोलताना तो थकत नाही आहे. उत्तर रामायणमध्ये लव तर श्री कृष्णामध्ये बालकृष्णाची भूमिका साकारणारा गोड स्वप्निल आजही अनेकांंच्या लक्षात आहे. मात्र त्याच्या मुलांना आज विश्वास होत नाही आहे की या दोन्ही भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे त्यांचे वडील आहेत.

(हे वाचा-अनुष्काने विराटला टाकला बाऊन्सर, लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना VIDEO व्हायरल)

'दुनियादारी', 'तू ही रे', 'मुंबई-पुणे-मुंबई' यांसारके एक से एक हिट चित्रपट देणाऱ्या स्वप्निल जोशीने अभिनयाची सुरुवात 'लव' आणि 'बालकृष्णा'च्या रुपात बालकलाकार म्हणूनच केली होती. त्यानंतर त्याने 'हद कर दी', 'सजन रे झूठ मत बोलो', 'गोलमाल है भाई सब गोलमाल है' या मालिकांमध्ये देखील काम केले. मराठीमध्ये देखील त्याच्या काही मालिका विशेष गाजल्या.

स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्रामवर उत्तर रामायणाच्या शूटिंग दरम्यानच्या अनेक गंमतीजमती शेअर केल्या आहेत. बालरुपातील त्याच्या फोटोंवर तर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. पण त्याच्या लहान मुलांना मात्र वाटत नाही आहे, हे त्यांचे बाबा आहेत.

स्वप्निल सांगतो की तो या मालिका त्यांच्या मुलांबरोबर पाहतो. आपल्या माणसांबरोबर वेळ घालवण्याचा सध्याचा काळ आहे. लॉकडाऊनमुळे लोकांवर खूप वाइट परिणाम झाला आहे. अशावेळी लोकांना शांतीची गरज आहे. या मालिका पाहून ही शांती नक्की मिळेल, असंही तो म्हणाला.

First published: May 16, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या