Home /News /videsh /

टोळधाड शाप नव्हे वरदान; टोळ विकून शेतकरी कमवत आहेत पैसा

टोळधाड शाप नव्हे वरदान; टोळ विकून शेतकरी कमवत आहेत पैसा

locust upsurge

locust upsurge

टोळधाडी मुळे शेतकऱ्यांच नुकसान झालेलं नेहमीच बघायला मिळत पण केनियामधले शेतकरी मात्र टोळधाडी मुळे मालामाल झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

केनिया, 24 फेब्रुवारी: शेतकऱ्यांनी (Farmers) काळ्या मातीत घाम गाळून पिकवलेलं सोनं टोळधाडीनं (Locust Plague) काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याचं आपण वाचतो, पाहतो. टोळधाडीच्या संकटावर मात करण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करतात; मात्र लाखोंच्या थव्यांनी येणारे हे छोटेसे कीटक हजारो हेक्टर शेती बघता बघता उद्ध्वस्त करतात. टोळधाड आल्यास कीटकनाशक औषधांचा फवारा मारला जातो, मात्र हे कीटक इतक्या प्रचंड संख्येनं असतात की एका वेळी सर्वांना मारणं शक्य होत नाही. त्यामुळे शेतीचं नुकसान होतं. शेतातील भरभरून आलेलं पिक बघून खुश झालेला शेतकरी अनेक स्वप्न बघत असतो, त्याची ही सगळी स्वप्न ही टोळधाड एका क्षणात धुळीला मिळवते. जगभरातील शेतकरी टोळधाडीच्या संकटांनं नेहमीच धास्तावलेले असतात; दर वर्षी कुठे ना कुठे या टोळधाडीचा फटका शेतकऱ्यांना बसतोच; पण आता आफ्रिकेतील केनिया देशातील शेतकऱ्यांना, मात्र टोळधाड हे संकट वाटत नाही. तिथल्या शास्त्रज्ञांनी टोळधाडीवर शोधून काढलेल्या उपायानं इथले शेतकरी अगदी खुश झाले आहेत. टोळधाड आता त्यांच्यासाठी नुकसान करणारी नाही, तर फायद्याची ठरत आहे. केनियामध्ये (Kenya) सध्या टोळधाडीचं संकट घोंघावत आहे; पण तिथले शेतकरी घाबरलेले नाहीत. विश्वास बसत नाही ना; पण हे सत्य आहे. कारण तिथली एक विज्ञान संस्था टोळ पकडून आणून देणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत देत आहे. ही संस्था या टोळ किड्याला मारून त्याच्यापासून प्रोटीनयुक्त पशुआहार आणि खत बनवत आहे. या संस्थेचं नाव आहे, द बिग पिक्चर (The Big Picture). या संस्थेनं टोळधाडीच्या संकटाचं वरदानात रुपांतर केलं आहे. ज्या ठिकाणी कीटकनाशकांचा फवारा मारणं शक्य नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून ही संस्था टोळ खरेदी करत आहे. आफ्रिकेतील समुद्रकिनाऱ्याजवळील भागात सध्या पाऊस पडत असल्यानं इथं टोळांची संख्या अमाप वाढली आहे. त्यामुळं लाईकीपिया, इसिओलो आणि साम्बुरू या भागातील शेतकऱ्यांकडून ही संस्था टोळ खरेदी करत आहे. एक किलो टोळ आणून दिल्यास पन्नास केनियन शिलिंग म्हणजेच साधारण 33 रुपये दिले जातात. त्यामुळं इथले शेतकरी सध्या जास्तीत जास्त टोळ कसे पकडता येतील याचा प्रयत्न करत आहेत. साधारण एक चौरस किलोमीटर लांबीच्या थव्यात  4 ते 8 कोटी टोळ असतात आणि असा एक थवा एका दिवसात दीडशे किलोमीटर अंतर पार करतो.

अवश्य वाचा -  तणावपूर्ण परिस्थितीतही चीन भारतानाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार; अमेरिकेलाही टाकलं मागे

शेतातील पिकावर धाड घालणाऱ्या टोळाचे थवे जाळ्या लावून रात्री टॉर्चच्या उजेडात पकडले जातात. त्यानंतर संस्थेतर्फे गावागावातून शेतकऱ्यांनी पकडलेले टोळ जमा करण्यात येतात. नंतर हे टोळ चिरडून, ते सुकवले जातात आणि त्यानंतर त्याची भुकटी बनवून त्यापासून पशुआहार (Animal Feed) आणि खत (Fertilizers) बनवले जाते. केवळ एक ते 8 फेब्रुवारी या काळात संस्थेनं 1.3 टन टोळ जमा केले, अशी माहिती द बिग पिक्चर संस्थेच्या संस्थापक लॉरा स्टेनफोर्ड (Laura Stanford) यांनी सांगितलं. लॉरा स्टेनफोर्ड यांना पाकिस्तानमधून (Pakistan) ही कल्पना मिळाली. तिथं काही लोक टोळ पकडून त्यापासून पशु आहार आणि खत बनवतात; मात्र तिथल्या सरकारनं या उपायावर लक्ष दिलेलं नाही. द बिग पिक्चर संस्थेनं मात्र या संकल्पनेवर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. यामुळे शेतीचं नुकसान कमी करण्यासही मदत झाली असून, शेतकऱ्यांनाही आर्थिक उत्पन्नाचा (Income Source) नवा मार्ग मिळाला आहे. त्यामुळं आता दरवर्षी येणारी टोळधाड इथल्या शेतकऱ्यांसाठी हमखास उत्पन्नाचे साधन बनणार आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Farmer, Innovation, International, Locust, Money

पुढील बातम्या