तणावपूर्ण परिस्थितीतही चीन भारतानाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार; अमेरिकेलाही टाकलं मागे

तणावपूर्ण परिस्थितीतही चीन भारतानाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार; अमेरिकेलाही टाकलं मागे

भारताच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. याबाबतीत चीनने अमेरिकेला पछाडलं असून चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार बनला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. असं असूनही चीन हा भारताचा 2020 सालातील सर्वात मोठा व्यापारिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. तर 2019 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज डॉलर्स इतका झाला होता. कोरोना साथीच्या काळात मागणीत घट झाल्याने भारत आणि अमेरिकेदरम्यान 2020 मध्ये 75.9 अब्ज डॉलर इतका व्यावसाय झाला आहे.

भारत-चीन द्विपक्षीय व्यापारात 40 बिलियन डॉलरचा तोटा

गेल्या वर्षी चीनसोबत सीमेवर सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकारने अनेक चिनी अ‍ॅप्सला भारतात बंदी घातली होती. तसंच चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चिनी गुंतवणूकही थांबवली होती. यादरम्यान मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतवर लक्ष्य केंद्रित केलं होतं. असं असूनही भारताला अवजड यंत्रसामग्री, दूरसंचार उपकरणं आणि घरगुती उपकरणं अशा वस्तू चीनमधून आयात कराव्या लागल्या. याकाळात चीनबरोबर भारताच्या द्विपक्षीय व्यापारात सुमारे 40 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला होता. हा तोटा कोणत्याही इतर देशांच्या व्यापाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

(वाचा-ट्रम्प यांनी किम जोंग उन यांना अमेरिकन विमानातून घरापर्यंत राइड ऑफर केली; पण...)

अमेरिका आणि युएई अनुक्रमे दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे भागीदार देश

भारताने 2020 मध्ये, चीनकडून एकूण 58.7 अब्ज डॉलर्सची आयात केली होती. जी अमेरिका आणि युएईच्या दोन्ही देशांच्या संयुक्त आयातपेक्षा जास्त आहे. अमेरिका आणि युएई हे अनुक्रमे भारताचे दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे व्यापारी भागीदार देश आहेत. कोरोनो साथीच्या काळात मागणी असतानाही भारताने विविध देशांतील आयातीवर निर्बंध घातले होते. असं असलं तरी, 2019 च्या तुलनेत भारताची निर्यात 11 टक्क्यांनी वाढून 19 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

(वाचा-इमरान सरकार संकटात, पाकिस्तानातील आंदोलन पेटलं)

कोरोना साथीमुळे चीनची अर्थव्यवस्था विस्कळीत

कोरोना साथीमुळे पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था खालावली होती. असं असलं तरी, वर्षाच्या अखेरीस युरोपियन युनियनकडून विविध वस्तूंची मागणी वाढली, चिनी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. परिणामी 2020 या वर्षात, चीन हा एकमेव देश होता, जिथे आर्थिक वाढ दिसून आली होती.

Published by: News18 Desk
First published: February 23, 2021, 6:04 PM IST

ताज्या बातम्या