Home /News /videsh /

'या' बुटांमध्ये मानवी रक्ताचा वापर, Nike ने कोर्टात ठोकला दावा; वाचा काय आहे प्रकरण

'या' बुटांमध्ये मानवी रक्ताचा वापर, Nike ने कोर्टात ठोकला दावा; वाचा काय आहे प्रकरण

अमेरिकेमधील ब्रूकलिनमध्ये असलेल्या एमएससीएचएफ (MSCHF) प्रँक कंपनीने नुकतंच सॅटन शूज नावाचा एक प्रकारचा शूज ऑनलाईन लाँच केला. हा शूज तयार करताना त्यामध्ये मानवी रक्ताचा वापर करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन, 31 मार्च : अमेरिकेमधील ब्रूकलिनमध्ये असलेल्या एमएससीएचएफ (MSCHF) प्रँक कंपनीने नुकतंच सॅटन शूज नावाचा एक प्रकारचा शूज ऑनलाईन लाँच केला. हा शूज तयार करताना त्यामध्ये मानवी रक्ताचा वापर करण्यात आला आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेता अमेरिकी रॅपर लिल नास एक्स याने एमएससीएचएफशी कोलॅबरेशन करून या सॅटन बुटाची जाहिरात केली, त्यामध्ये त्याला 666 क्रमांकाचा बुट मिळाल्याचं तो दाखवतो आहे. हा सॅटन शूज तयार करताना एमएससीएचएफनी बूट उत्पादक कंपनी Nike ची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. तसंच त्या प्रोजेक्टबद्दल कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे त्या कंपनीवर कारवाई केली जावी अशी मागणी करत Nike कंपनीने न्यूयॉर्कमधील कोर्टात खटला भरला आहे. सॅटन काय आहे? मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्युंच्या धार्मिक ग्रंथांत दुष्टशक्तींचं प्रतीक असलेल्या राक्षसाला किंवा सैतानाला सॅटन म्हणतात. तिन्ही धर्मांमध्ये त्याची मांडणी किंवा नावं थोडी वेगळी आहेत पण संकल्पना सैतान अशीच आहे. हा सैतान रक्तपिपासू आहे. त्या संकल्पनेवर आधारित बुट एमएससीएचएफ कंपनीने तयार केले आणि ते ऑनलाईन विक्रीसाठी लाँच केले. एका मिनिटाच्या आत ते विक्रीही झाले. या शुजची जाहिरात रॅपर लिलने केली होती.

(वाचा - ना क्रेन, ना टगबोट; पौर्णिमेच्या चंद्रामुळे निघालं सुएझ कालव्यात अडकलेले ते जहाज)

कसे तयार झाले शुज? Nike कंपनीचे एअर मॅक्स 97 हे शुज घेऊन एमएससीएचएफ कंपनीने सॅटन शुज तयार केले. शुजच्या प्रत्येक जोडीतील एअरबबल भरण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्याचं रक्त आणि शाई यांचं मिश्रण वापरण्यात आलं. हे काळ्या आणि लाल रंगाचे स्निकर्स सॅटन शुज म्हणून सादर झाले आणि लगेच विकलेही गेले असं सीएनएनच्या वृत्तात म्हटलं आहे. Nike ने भरला खटला दरम्यान हे बुट तयार करण्यासाठी आपल्या कंपनीचे बुट वापरण्यात आल्याची पूर्वकल्पना नव्हती, असं स्पष्टीकरण देत कंपनीने यातून आपलं अंग काढून घेतलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सैतान अशी थिम घेऊन तयार करण्यात आलेल्या सॅटन शुजमध्ये काळा आणि लाल रंग वापरून आपल्या बुटांवरून ट्रेडमार्क एमएससीएचएफ प्रॉडक्ट स्टुडिओ आयएनसीने पुसट करण्यात आला आहे असा दावा Nike ने भरलेल्या खटल्यात करण्यात आला आहे. या खटल्यात रॅपर लिलचं नाव मात्र Nike ने घेतलेलं नाही. सोमवारी जेव्हा हा शूज ऑनलाइन लाँच झाला, तेव्हा 1 हजार 18 डॉलरना एक जोडी या किंमतीला हे शुज एका मिनिटात विकले गेले असा दावा अनेक माध्यमांनी केला. Nike कंपनीची परवानगी न घेताच हा शुज तयार करण्यात आला आणि या प्रोजेक्टशी कंपनीचा तीळमात्रही संबंध नाही असंही कंपनीने या वेळी स्पष्ट केलं आहे. सैतानाचे बुट लाँच करायला Nike कंपनीनी परवानगी दिली त्यामुळे तिच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला असे अनेक मेसेजेस समाज माध्यमांतून पाठवले जात आहेत. पण हा लोकांचा गैरसमज झाला आहे. Nike कंपनीने या प्रकाराला कुठलीच परवानगी दिली नव्हती, असंही Nike नं या तक्रारीत म्हटलं आहे.

(वाचा - संकटात आठवला शेजारी, पाकिस्तान भारताकडे करणार मदतीची विनंती!)

बुटांच्या आलेल्या ऑर्डरची विक्री पूर्तता करणं एमएससीएचएफ कंपनीने तातडीने थांबवावं आणि कंपनीच्या झालेल्या अब्रुनुकसानीसंबंधी खटल्याची सुनावणी करावी असं Nike ने म्हटलं आहे. एक विचित्र बाब अशी की ट्विटरवर सॅटन शुजच्या विषयाचं समर्थन आणि विरोध दोन्हीही जोरदार झालं आहे. 21 वर्षांचा रॅपर लिलने शुक्रवारी त्याच्या नव्या मोंटेरो “Montero (Call Me By Your Name)” या गाण्याचा व्हिडीओ लाँच केला होता. ज्यात त्याने राक्षसासारखी खोटी शिंग डोक्यावर लावून आणि पायात सॅटन शुज घालून नाच केला होता. त्यामुळे त्याबद्दलही वाद निर्माण झाला पण लिलनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून ती असाइनमेंटची गरज होती असं म्हटलं आहे.
First published:

Tags: Brand, International

पुढील बातम्या