Home /News /viral /

Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?

Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?

काही खेळाडू असेही आहेत, जे या ऑलिम्पिकमध्ये सहभागी नाहीत, तरीही लोक त्यांनी चर्चा करत असल्यामुळे ते सोशल मीडियावर व्हायरल (viral) होत आहेत.

    जपानची (Japan) राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) सुरु असलेल्या ऑलिम्पिकमधील (Olympic) अनेक खेळाडू सध्या चर्चेत आहेत. काहीजण त्यांच्या खेळामुळे (Sports) चर्चेत आहेत, तर काही त्यांच्या सौंदर्यामुळे. (Beauty) मात्र काही खेळाडू असेही आहेत, जे या ऑलिम्पिकमध्ये सहभागी नाहीत, तरीही लोक त्यांनी चर्चा करत असल्यामुळे ते सोशल मीडियावर व्हायरल (viral) होत आहेत. Tzuyu नावाच्या एका तरुणीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ती चीन, तैवान आणि कोरियाची तिरंदाज असल्याची चर्चा आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या Tzuyuच्या व्हिडिओत ती तिरंदाजी करताना दिसते. कुणी म्हणतं की ती चीनची आहे, कुणी म्हणतं कोरियाची आहे. मात्र वास्तविक ती सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागीच नाही. दरम्यान, ब्राझीलच्या एका पत्रकाराने ट्विट करून माहिती दिली की Tzuyu ने आईडल स्टार ऍथलेटिक्समध्ये सहभाग घेतला होता. Tzuyu चा सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा तिने ISAC मध्ये सहभाग घेतला होता. जेव्हा जेव्हा ती या स्पर्धेत सहभागी होते तेव्हा तेव्हा आपल्या कामगिरीसोबत आपल्या सौंदर्यानेही अनेकांना घायाळ करते. Tzuyuचा व्हिडिओ हा 2019 सालचा आहे. Tzuyu ही तैवानची नागरिक असून ती एक गायिका आहे. अर्थात तिनं ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, तर तिच्या चाहत्यांना ते आवडेलच. कोरोना लवकरच संपेल आणि ISAC मध्ये Tzuyu पुन्हा दिसेल, अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Olympics 2021, Tokyo, Video viral

    पुढील बातम्या