नवी दिल्ली, 28 एप्रिल: टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स या अमेरिकी कंपन्यांचे (SpaceX) सीईओ (CEO) एलॉन मस्क (Elon Musk) सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क सध्या ट्विटर (Twitter) या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या खरेदीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पराग अग्रवाल आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या भवितव्याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे ट्विटरच्या पॉलिसी हेड (Policy Head) विजया गाडे (Vijaya Gade) यांचं. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कंपनीच्या सेन्सॉरशीपशी (Sensor) संबंधित सर्व निर्णय विजया गाडे घेतात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं ट्विटर अकाउंट बॅन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या सर्वप्रथम चर्चेत आल्या होत्या. ट्विटरचे नवीन बॉस मस्क यांनी विजया यांच्या सेन्सॉरशिप पॉलिसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क या दोघांचे चाहते विजया गाडे यांना टार्गेट करत आहेत. ट्रोलर्स देखील त्यांच्यावर टीका करत आहेत. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर विजया बोर्ड मीटिंगमध्ये (Board Meeting) फार भावूक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. IPL 2022 : हार्दिकला आऊट केल्याबद्दल उमराननं मागितली नताशाची माफी! जाणून घ्या Viral Photo मागील सत्य ट्विटर एलॉन मस्क यांच्या ताब्यात गेल्यानंतर परिस्थिती बदलल्याचं निदर्शनास येत आहे. ट्विटरचं आता प्रायव्हेटायझेशन होत असून, त्याचा कंट्रोल एलॉन मस्क यांच्या हातात असेल. त्यामुळे सेन्सॉरशी संबंधित निर्णयांमुळे मस्क यांनी विजया गाडे यांना टार्गेट केलं आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क पोस्टनं (New York Post) अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनच्या लॅपटॉपबाबत एक स्पेशल स्टोरी (Special Story) केली होती. या स्टोरीमुळे गाडे यांनी न्यूयॉर्क पोस्टचं ट्विटर अकाउंट सस्पेंड केलं होतं. मस्क यांनी गाडेंच्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती. पॉडकास्ट होस्ट सागर एन्जेटीच्या (Saagar Enjeti) ट्विटला उत्तर देताना, एलॉन मस्क यांनी लिहिलं होतं, ‘एक खरी स्टोरी पब्लिश केल्यामुळे एका प्रमुख वृत्तसंस्थेचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करणं अत्यंत चुकीचं आहे.’ या सर्व प्रकरणामुळे, आता विजया गाडे आणि एलॉन मस्क एकमेकांसोबत काम करणार की नाहीत याबाबत शंका उपस्थित होत आहेत. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या 48 वर्षीय विजया गाडे या ट्विटरच्या सेफ्टी, लीगल इश्यु आणि सेन्सिटिव्ह बाबी हाताळतात. त्यांनी 2011 मध्ये ट्विटर जॉईन केलं होतं. तेव्हापासून त्या हे काम करत आहेत. विजया यांना ट्विटरच्या एक्झिक्युटिव्ह टीममधील (Twitter Executive Team) सर्वांत प्रभावी महिला मानलं जातं. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याचा निर्णय विजया यांनी घेतला होता. यावरून त्यांच्या पॉवरचा अंदाज येऊ शकतो. याशिवाय, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांच्यावरही विजया यांचा प्रभाव होता. 2020 मध्ये यूएस निवडणुकीत राजकीय जाहिराती विकणं चुकीचं असल्याचं विजया यांनी जॅकना पटवून दिलं होतं. एलॉन मस्क आणि विजया गाडे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं यापूर्वीच निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता विजया गाडे ट्विटरमध्ये राहणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.