मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जेलीफिशसारख्या जीवांमुळे अणुऊर्जा केंद्राचं काम ठप्प; कंपनीला तब्बल 162 कोटींंचा फटका

जेलीफिशसारख्या जीवांमुळे अणुऊर्जा केंद्राचं काम ठप्प; कंपनीला तब्बल 162 कोटींंचा फटका

फोटो सौजन्य - गेटी

फोटो सौजन्य - गेटी

जेलीफिशसारख्या दिसणाऱ्या या जीवांमुळे अणुऊर्जा केंद्राचं (atomic energy centre) मोठं नुकसान झालं आहे.

सिऊल, 08 एप्रिल :  सागरीजीवसृष्टीत असे काही जीव आहेत ज्यांनी चक्क अणुऊर्जा केंद्राचं (atomic energy centre) काम खोळंबवून ठेवलं आहे. इतकंच नव्हे तर यामुळे कंपनीचं कोट्यवधींचं नुकसान ही झालं आहे. सी सैल (Sea Salps) असं या जीवांचं नाव असून ते जेलीफिशसारखेच (Jellyfish) दिसतात.

जेलीफिशसारख्या दिसणाऱ्या हे जीव जिलेटिनसारखे असून त्यांची लांबी 10 सेमी असते. दक्षिण कोरियात (south korea) या जीवांनी एक नवी डोकेदुखी निर्माण केली आहे. या जीवांनी दक्षिण कोरियातील अणुऊर्जा केद्रांतील कूलिंग सिस्टम जाम केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण काम ठप्प झालं आहे.

दक्षिण कोरियातील (South Korea)  कोरिया हाइड्रो अँड न्यूक्लियर पावर कार्पोरेशनच्या हानूल नंबर एक आणि नंबर दोनचे रियॅक्टर्सच्या (nuclear reactors) कूलिंग सिस्टम या सागरी जीवांनी जाम केलं आहे. 950 मेगावॅट (megawatt) क्षमता असलेले हे रिअॅक्टर्सना आहेत. त्यामुळे अणुऊर्जा केंद्र बंद करावं लागलं आहे. संपूर्ण केंद्र हे ऑफलाइन कराव लागलं आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झालं आहे.

हे वाचा -  सावधान! तुम्हीसुद्धा मोफत Netflix डाऊनलोड केलं नाही ना?

पण वैज्ञानिकांना मात्र वेगळीच चिंता सतावत आहे ती म्हणजे जून महिन्याच्या दरम्यान या सागरी सेल जीवांची संख्या प्रामुख्याने वाढते आणि त्यावेळी ही समस्या उद्भवण्याचा धोका असतो. पण यावेळी मात्र ऐन मार्च महिन्यातच ही संख्या वाढलेली दिसत आहे. समुद्राचं तापमान वाढल्याने हे जीव थंडाव्याच्या शोधात असतात आणि कूलिंग सिस्टम (cooling system) मध्ये जमा होतात. हे त्याचचं कारण असल्याचे त्यांचे मत आहे.  नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरीज सायन्सेजचे (national institute of fisheries sciences) एक्सपर्ट यून सियोक ह्यून यांनी सांगितलं, जरी वातावरण बदलातील समस्या असली तरीही पुढील काळात ही समस्या वाढणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - रेल्वे स्थानकात 'द बर्निंग ट्रेन', तीन डबे जळून खाक

अणुऊर्जाकेंद्र हे विशेषत: समुद्र किनारी बनवले जातात. जेणेकरून रिय़ॅक्टर्समध्ये ठेवण्यात आलेलं इंधन हे शीत ठिकाणी राहिल आणि समुद्राच्या पाण्याचा यासाठी उपयोग होईल. कोरियन शासनाच्या अनुसार केवळ 8 दिवसांत 21.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 162 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आणखीही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.

First published:
top videos

    Tags: Fish, South korea