बापरे! हवेतुनही पसरू शकतो कोरोना व्हायरस, 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला हा इशारा

बापरे! हवेतुनही पसरू शकतो कोरोना व्हायरस, 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला हा इशारा

या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तिंपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क 7 जुलै: सर्व जगभर कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी संशोधनही सुरू आहे. कोरोना पसरण्याची कारणे, त्याची लक्षणे यासंदर्भात खूप माहिती प्रसिद्ध झाली आहे. मात्र आता काही देशांच्या शास्त्रज्ञांनी त्याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहिलं आहे. कोरोनाचा व्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो असं या शास्त्रज्ञांचं मत आहे. याबाबतीत WHOने योग्य अभ्यास केलेला नाही असा ठपकाही या शास्त्रज्ञांनी ठेवला आहे.

जगातल्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी यासंर्भात WHOला पत्र लिहिलं आहे. त्यात पत्रात सगळ्या कारणांचा उहापोह करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्ण शिंकला किंवा त्याला खोकला आल्यास त्यातल्या तुषारांमधून हा व्हायरस हवेत जातो आणि तो जास्त काळ राहू शकतो. त्यांच्या बोलण्यामुळेही हा व्हायरस हवेत पसरतो आणि सुक्ष्म तुषारांच्या  रुपातही तो राहू शकतो. त्यामुळे त्याविषयी WHOने अभ्यासपूर्ण मार्गदर्शक तत्वे जारी केलेली नाही असा ठपकाही या शास्त्रज्ञांनी ठेवला आहे.

चीन, अमेरिका, इटली, ब्राझील या देशांतल्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तिंपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे.

2021 पर्यंत भारताची कोरोना लस येणार नाही; भारत बायोटेकनेही खोडला ICMR चा दावा

दरम्यान,  वुहानमधून पसरलेल्या कोरोनाचा संसर्ग चीननं लपवल्यामुळे आणि काळजी न घेतल्यानं पसरल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात असतानाच आता एका अहवालातून आणखी एक मोठा आरोप चीनवर लावण्यात आला आहे. 7 वर्षांपूर्वीच चीनला या व्हायरसंदर्भात कुणकुण लागली होती. कारण 2013 मध्ये या व्हायरच्या जवळ जाणारे काही विषाणू चीनमध्ये सापडले होते. thetimes.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार चीननं जाणीवपूर्व ही माहिती जगापासून लपवून ठेवली होती. 2013 पासून चीन ही माहिती लपवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

VIDEO : इंग्लंडच्या रस्त्यांवर तोबा गर्दी; लॉकडाऊन संपताच नागरिकांचं सेलिब्रेशन

द सननं दिलेल्या वृत्तानुसार वटवाघूळ आणि उंदरापासून एका विषाणूचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं होतं. 2013 मध्ये मिळालेला विषाणू हा कोरोना विषणूच्या जवळचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हायरसचे स्ट्रेन चीनच्या वुहानमधील रुग्णालयात सापडले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: July 7, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या