नवी दिल्ली, 5 जुलै : तीन महिन्यांचा लॉकडाऊन उठल्यानंतर इंग्लडच्या रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंग्लंडमधील पब्स, रेस्टॉरंट, सलून, सिनेमागृह सुरू झाले असून तेथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगभरात कोरोना कहर वाढत आहे. यामध्ये हळूहळू अनेक देश लॉकडाऊन उठवत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ हे देश लॉकडाऊनमध्ये होते. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि लॉकडाऊन उठवल्याचा आनंद घेत आहेत.
इंग्लडमधील अनेक इमारतीवर लाइट लावण्यात आले असून कोरोनाच्या कहरात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांना नागरिकांना नाईट आऊट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी 30 टक्के बार, पब्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहे. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
#Soho chaos as thousands swarm the streets after pubs rammed in Super Saturday mayhemhttps://t.co/DOCW1X2scy pic.twitter.com/cCrYfmvpZB
— Daily Express (@Daily_Express) July 5, 2020
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक रेस्टॉरंट मालकांनी लॉकडाऊन उठल्यानंतर काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन रेस्टॉरंट उघडण्यात येईल असे सांगितले आहे. संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे