2021 पर्यंत भारताची कोरोना लस येणार नाही; सरकारनंतर आता भारत बायोटेकनेही खोडला ICMR चा दावा

2021 पर्यंत भारताची कोरोना लस येणार नाही; सरकारनंतर आता भारत बायोटेकनेही खोडला ICMR चा दावा

15 ऑगस्टपर्यंत भारतातील कोरोना लस लाँच होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : भारताने तयार केलेली कोरोनाची लस (INDIA CORONA VACCINE) कोवॅक्सिन (COVAXIN)  15 ऑगस्टपर्यंत लाँच होणार अशी शक्यता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने व्यक्त केली होती. इतक्या लवकर लस उपलब्ध होण्याबाबत तज्ज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्यानंतर सरकारने 2021 पर्यंत कोरोना लस येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. सरकारपाठोपाठ आता ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकनेही (BHARAT BIOTECH)  2021 पर्यंत लस येणार नाही, असं सांगत आयसीएमआरचा दावा खोडून काढला आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन लशीचं ह्युमन ट्रायल 7 जुलैला होणार असल्याचं आयसीएमआरने म्हटलं होतं.  मात्र आता भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलैला कोरोना लशीचं ट्रायल सुरू होणार आहे. या लशीचं दोन टप्प्यात ट्रायल होणार आहे. हे दोन टप्पे संपण्यासाठी 6 महिने लागतील.  ट्रायल पूर्ण होण्यासाठी अंदाजे एक वर्षे आणि तीन महिने लागतील. त्यामुळे 2021 पर्यंत ही लस येणार नाही असं कंपनीनं सांगितलं आहे.

हे वाचा - मुंबईत कोरोना कधीपर्यंत संपूर्ण नियंत्रणात येणार? आता BMC नेच सांगितली तारीख

कोरोनाव्हायरसवर जगभरात लस शोधण्याचं काम सुरू आहे. त्यात भारतही आघाडीवर असून दोन कंपन्यांनी मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मागितली. त्यानंतर देशात नव्या वादाला सुरूवात झाली. 15 ऑगस्टपर्यंत देशात कोरोनावर लस येऊ शकते असं ICMRने म्हटलं होतं. त्यावर शंका उपस्थित करण्यात येत होती. या वादावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (Science & Technology Ministry) भाष्य केलं असून 2021पर्यंत ही लस बाजारात येणार नाही असं म्हटलं  आणि आता भारत बायोटेकनेदेखील तसंच सांगितलं आहे.

हे वाचा - कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे संकट, चीनमध्ये हाय अलर्ट जारी

जगभरात 140 कंपन्यांची औषधं मानवी चाचणीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचली आहेत. त्यात 11 औषधं ही भारताची आहेत. त्यात कोवॅक्सिन आणि ZyCov-D या दोन औषधांची माणसांवर प्रयोगाची घोषणाही झाली आहे. ICMRच्या घोषणेनंतर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती.

अशा कामांमध्ये घाई करू नये असाही सल्ला दिला गेला होता. त्यानंतर विज्ञान मंत्रालायाने स्पष्टिकरण देत ICMRचा दावा खोडून काढला आहे. औषध वापरासाठी येण्यापूर्वी अनेक परीक्षणांमधून त्याला जावं लागतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या प्रक्रियेत काही सवलत जरी दिली गेली तरी मूलभूत नियमांना डावललं जाऊ शकत नाही, असं सरकारनं सांगितलं.

संपादन - प्रिया लाड

Published by: Priya Lad
First published: July 6, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading