प्रोंगयांग, 30 डिसेंबर: उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा (Dectator) किम जोंग उन (Kim Jong Unn) यांचं वजन (Weight loss) कमालीचं घटलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जाडजुड दिसणारे किम आता अगदी सडपातळ दिसू लागले आहेत. अनेक महिने माध्यमांसमोर न आलेले किम जेव्हा अचानक प्रकटले, तेव्हा त्यांच्याकडे पाहून सर्वांनाच धक्का बसला. डोळ्यात भरावं इतपत त्यांचं वजन कमीी झालं आहे.
View this post on Instagram
दुष्काळामुळे कमी खाणं
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांन देशवासियांना कमी खाण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियात सध्या दुष्काळ आहे. गेल्या सुमारे वर्षभरापासून नागरिक दुष्काळाचा सामना करत असून अन्नधान्याची मोठी टंचाई देशात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला सल्ला दिल्याप्रमाणे आपणही कमी खाण्याचा निर्णय किम जोंग यांनी घेतला असून त्याचा परिणाम वजनावर झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
घटले 40 पाउंड
गेल्या काही महिन्यात किम जोंग यांचं वजन सुमारे 40 पाउंड म्हणजेच 18 किलो कमी झाल्याची माहिती कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं दिली आहे. या फोटोत ते अगदी बारीक दिसत असून त्यांचा चेहरादेखील बदलला आहे. मात्र वजन घटल्याचा त्यांच्या तब्येतीवर कुठलाही परिणाम झाला नसून ते ठणठणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून किम जोंग हे जनतेसमोर आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण होत होती. त्यात ते अचानक बारीक झाल्याचं दिसल्यामुळे अनेकांना धक्का बसला.
हे वाचा- धक्कादायक! इवल्याशा खारीची दहशत; 2 दिवसांत 18 लोकांना बनवली आपली शिकार
राजधानीत बैठक
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये आयोजित एका परिषदेच्या निमित्तानं किम जोंग यांचं जनतेला दर्शन झालं. सध्याचा दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चीनची बॉर्डर सध्या बंद असल्यामुळे आयात थांबली आहे. 2025 नंतर ही सीमा खुली करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन किम जोंग यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, North korea, Weight, Weight loss