Home /News /videsh /

धक्कादायक! इवल्याशा खारीची दहशत; 2 दिवसांत 18 लोकांना बनवली आपली शिकार

धक्कादायक! इवल्याशा खारीची दहशत; 2 दिवसांत 18 लोकांना बनवली आपली शिकार

छोट्याशा खारीने नागरिकांवर केला हल्ला.

    लंडन, 29 डिसेंबर : इटुकली पिटुकली खार (Squirrel), जिला आपण झाडावर सरसर चढताना पाहतो. अगदी चपळाईने पळताना पाहतो. तिला पाहताच आपल्या तोंडातून सो क्युट असेच शब्द येतात. अशी शांत आणि गोड दिसणारी खार आता चक्क लोकांवर हल्ला करू लागली आहे (Grey Squirrel Attack). एका खारीने 2 दिवसांत 18 लोकांना आपली शिकार बनवली आहे (Squirrel attak on people). वाघ, बिबट्याप्रमाणे लोक आता खारीच्या दहशतीत आहेत. अवाढव्य जंगली प्राण्यांप्रमाणे छोटीशी खारही आता माणसांवर हल्ला करत आहे. ब्रिटनच्या फ्लिंटशायरमध्ये (UK, Flintshire) खारीने दहशत माजवली आहे. लोकांनी या खारीचं नाव स्ट्राइप (Stripe) असं ठेवलं आहे. 'द ग्रेमलिन्स' (The Gremlins) फिल्ममधील खलनायकाचं हे नाव आहे. गार्डनमध्ये फिरण्यासाठी येणारे वयस्कर व्यक्ती, लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांवर ती हल्ला करत होती. आठवड्याभरात कमी कमी 18 लोकांना तिने जखमी केलं आहे. लोकांच्या हातावर तिने चावल्याच्या आणि ओरखडे ओडल्याच्या जखमा आहेत. हे वाचा - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू जेन हॅरी नावाची महिला आपल्या मुलीसोबत घरी जात होती तेव्हा त्या खारीला पाहिलं. ही खार शांत असावी असं तिला वाटायचं. पण जशी ती तिच्या जवळ गेली तसं तिने तिच्या 29 वर्षांची मुलगी क्लोच्या मानेवर उडी मारली आणि तिला चावली. गॅरीने खारीला हटवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तिने क्लोच्या खांद्याला तिने वेळा चावा घेतला. आणखी एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितलं की त्या व्यक्तीच्या मांजरींवरही खारीने हल्ला केला होता. 48 तासांच्या प्रयत्नांनंतर या खारीला पकडण्यात यश मिळालं आहे.  65 वर्षांच्या कोरीन रेनॉल्ड्स यांनी (Corrine Reynolds) या खारीला पकडलं. त्यावेळी ती त्यांच्या हातालाही चावली. रेनॉल्ड्स यांनी सांगितलं, खारीच्या हल्ल्याची अनेक प्रकरणं पाहिल्यानंतर तिला पकडण्याचा निर्णय घेतला. 48 तासांत या खारीने 18 लोकांवर हल्ला केल्याचं मला समजलं. जे लोक रिसाइक्लिंग बॅग कचऱ्याच्या डब्यात टाकत होते, अशाच लोकांना ती चावली आहे. हे वाचा - Shocking Video! खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अजगराने घातला विळखा डेली मेलच्या रिपोर्टनुसार 28 डिसेंबरला पकडून तिला RSPCA या प्राण्यांच्या संस्थेकडे तिला देण्यात आलं आहे. RSPCA ने सांगितलं की त्या खारीला मारण्यात आलं आहे. कारण तिला पुन्हा जंगलात सोडणं अवैध होतं. कारण ती एक ग्रे खार होती. खारीची ही प्रजात इतर प्रजातींपेक्षा जास्त आक्रमक असते. नियमानुसार तिला सोडू शकत नाही. लाल खारीपेक्षा ही पूर्णपणे वेगळी असते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Attack, Other animal, Uk, World news

    पुढील बातम्या