मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Blood Sea: इथे रक्ताळला समुद्र! शेकडो व्हेल माशांची निर्घृण कत्तल; कारण ऐकून हैराण व्हाल

Blood Sea: इथे रक्ताळला समुद्र! शेकडो व्हेल माशांची निर्घृण कत्तल; कारण ऐकून हैराण व्हाल

हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे Feroe Island नावाच्या बेटावरचं. खरोखर समुद्राचं पाणी रक्ताने लालेलाल झालंय. काय आहे हा प्रकार आणि कुणी मारलं त्या निष्पाप मुक्या माशांना?

हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे Feroe Island नावाच्या बेटावरचं. खरोखर समुद्राचं पाणी रक्ताने लालेलाल झालंय. काय आहे हा प्रकार आणि कुणी मारलं त्या निष्पाप मुक्या माशांना?

हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे Feroe Island नावाच्या बेटावरचं. खरोखर समुद्राचं पाणी रक्ताने लालेलाल झालंय. काय आहे हा प्रकार आणि कुणी मारलं त्या निष्पाप मुक्या माशांना?

कोपनहेगन (डेन्मार्क), 1 जुलै : जगभरात अनेक विचित्र परंपरा (world Tradition) जोपासल्या जातात. अनेक देशांतील आदिवासी समाजांमध्ये विविध पशूंचा देवांना बळी दिला जातो. भारतातही अनेक ठिकाणी पशूबळी दिले जातात. पण आता या परंपरा थोड्या कमी झाल्या आहेत. शिक्षणानेही बराच फरक पडला आहे. परंतु, डेन्मार्कमध्ये (Denmark) अशी जागा आहे की तेथील हृदय पिळवटून टाकणारी परंपरा जोपासली जाते आणि या परंपरेमुळे तेथील समुद्राचं पाणी रक्तानी लाल होतं. येथील एका बेटावर (Feroe Island) तेथील स्थानिक लोक व्हेल (killing Whales for tradition) माशांची शिकार करतात. हे दृश्य मन हेलावून टाकणारं असतं. या परंपरेला पर्यावरण व वन्यजीव संरक्षणवादी कार्यकर्त्यांनी सातत्याने विरोध केला आहे. परंतु, स्थानिक लोक या विरोधाला जुमानत नाहीत. या लोकांच्या म्हणण्यानुसार, या बेटाच्या परिसरात जंगल नसल्याने त्यांना अन्नासाठी समुद्रावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ते व्हेल माशांची शिकार करतात. गेल्या दशकभरात या परंपरेमुळे 6 हजारांवर व्हेल आणि डॉल्फिन (Dolphin) माशांचा बळी गेला आहे. तसेच या परंपरेमुळे संरक्षणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळत आहे.

डेन्मार्कमधील फेरो आयलंडमध्ये दरवर्षी पायलट व्हेल (Pilot Whales) या माशाच्या शिकारीचे आयोजन केले जाते. या परंपरेला किंवा प्रथेला ग्राईंड्रॅप (Grind Rap) किंवा द ग्राईंड (The Grind) असं देखील म्हटलं जातं. या परंपरेनुसार, व्हेल माशाला लक्ष्य केलं जातं, त्यानंतर त्याच्यावर हुक, चाकू किंवा भाल्याने वार करुन त्याला मारुन टाकलं जातं.

मोफत वाटप केलं जातं मांस

रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशाची शिकार केल्यानंतर स्थानिक लोक या माशाचे मांस भाजून, शिजवून किंवा सुकवून खातात. तसेच हे मांस मोफत वाटप केले जाते.

Explainer : Delta Plus Variant चा महाराष्ट्राला सर्वाधिक धोका का?

येथे व्हेल माशाच्या शिकारीला कायदेशीर मान्यता देखील मिळालेली आहे.

या परंपरेविरोधात उठवला होता आवाज

वन्यजीव संरक्षक चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने या परंपरेविरोधात आवाज उठवत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक नाराज आहेत. या बेटावर राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात जंगल नसल्याने अन्नासाठी त्यांना समुद्रावरच अवलंबून राहावं लागतं.

'या' देशात मिळाली ड्रॅगन मॅनची कवटी; मानवी उत्क्रांतीचे अनेक गूढ उलगणार!

परंतु, याबाबत संरक्षणवादी कार्यकर्त्यांचे मत काहीसे वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही परंपरा अत्यंत रानटी आहे.

2021 मध्ये 175 व्हेल्स मारले गेले

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार, यावर्षी म्हणजे 2021 वर्षात आतापर्यंत 175 व्हेल्स माशांना मारुन टाकण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सी शेफर्ड नावाच्या समुद्र संरक्षणवादी कार्यकर्त्यांनी या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची छायाचित्रे ड्रोनव्दारे (Drone) टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका शिकाऱ्याने या ड्रोनवर बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. सी शेफर्डने दिलेल्या माहितीनुसार, या रक्तरंजित परंपरेमुळे मागील एका दशकात 6500 हून अधिक व्हेल आणि डॉल्फिन माशांचा बळी गेला आहे.

First published:

Tags: Fish, Whale