Home /News /explainer /

Explainer : Delta Plus Variant चा महाराष्ट्राला सर्वाधिक धोका का?

Explainer : Delta Plus Variant चा महाराष्ट्राला सर्वाधिक धोका का?

देशात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आहेत.

मुंबई, 26 जून : देशात कोरोनाचा (Corona) सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) दिसून आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातच होती. यंदा आलेल्या दुसऱ्या लाटेतही कोरोना विषाणूने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. आता तज्ज्ञ तिसरी लाट येण्याचा इशारा देत आहेत. याचं कारण आहे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant). तिसरी लाट (Third Wave) या व्हेरिएंटमुळे येईल असं खात्रीने सांगता येत नसलं, तरी धोका मात्र कायम आहे आणि या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली, तर या लाटेत 50 लाख लोकांना संसर्ग होईल अशी चर्चा आहे. यात संक्रमित लहान मुलांची संख्या 5 लाख असेल. या सर्व शक्यता असून सरकार या अनुषंगाने सध्या तज्ज्ञांशी चर्चा करीत आहे. या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व शक्यतांवर चर्चा करण्यात आली. हे वाचा - मोदी सरकारनेही दिला ग्रीन सिग्नल; प्रेग्नन्सीत कोरोना लस घेणं का आहे महत्त्वाचं? राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी (25 जून) सांगितलं, की तिसऱ्या लाटेदरम्यान अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 8 लाखांपर्यंत जाऊ शकते. सुमारे 5 लाख लहान मुलं संक्रमित होऊ शकतात, त्यापैकी 2.5 लाख मुलांना शासकीय रुग्णालयांची गरज भासू शकते. महाराष्ट्रालाच का आहे धोका? आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी सांगितलं, की महाराष्ट्राला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा जास्त धोका असू शकतो. त्यामुळे राज्य यापूर्वीच सतर्क झालं आहे. त्यांनी सांगितलं, की म्युटेशनमुळे जिवंत विषाणूची संख्या जास्त प्रमाणात वाढते. यातच कोरोनाबाधितांची संख्या वाढली. तर ही संख्या अजून वाढू शकते. लाट हा चिंतेचा विषय राहिलेला नाही. आपण आपल्या बेजबाबदार व्यवहारांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू दिला आहे. हा चिंतेचा विषय असून, आतापर्यंत सर्वाधिक केसेस महाराष्ट्रातच आढळून आल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यांनी वाढवली चिंता? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी सांगितलं, की महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) अजूनही 5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही बाब चिंताजनक म्हणता येईल. त्यात रायगड, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, पालघर आणि उस्मानाबादचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने काही भागांमध्ये पुन्हा निर्बंध लावले आहेत, हे योग्य पाऊल असल्याचं डॉ. भार्गव यांनी सांगितलं. महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या केसेस कोरोनाचा डेल्टा प्लस व्हॅरिएंट महाराष्ट्रात खूप काळापासून अस्तित्वात आहे. डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण या वर्षी एप्रिलमध्ये मिळाला होता. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हॅरिएंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची पहिली केस नोंदवली गेली आहे. हे वाचा - Explainer: कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यात आहे का हे कसं समजतं? शुक्रवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, की रत्नागिरीतल्या एका वयोवृद्ध महिलेचा या व्हॅरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. ही महिला संगमेश्वर येथे राहणारी होती. या महिलेच्या मृत्यूची चौकशी केली जात असून, या महिलेला अन्य काही गंभीर आजार होते का, याबाबतही माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत किती केसेस? केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितलं, की आतापर्यंत देशात जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) केलेल्या 45,000 नमुन्यांपैकी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या 48 केसेस स्पष्ट झाल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक 20 केसेस महाराष्ट्रातल्या आहेत.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Maharashtra

पुढील बातम्या