• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार? बायडेन यांच्यासोबत मतभेदांची चर्चा

कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार? बायडेन यांच्यासोबत मतभेदांची चर्चा

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावरून (Kamla Harris likely to be removed from the position after conflict with Joe Biden) कमला हॅरिस यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 17 नोव्हेंबर: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावरून (Kamla Harris likely to be removed from the position after conflict with Joe Biden) कमला हॅरिस यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आपल्याला साईडलाईन केलं जात असल्याचा (Complaint of sidelining) दावा कमला हॅरिस यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे, तर कमला हॅरिस या अमेरिकी जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचं राष्ट्रपती जो बायडेन यांचे समर्थक दबक्या आवाजात सांगत आहेत. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये (All is not well in White House) सर्व काही आलबेल नसल्याचं सांगण्यात येत आहे. अवघड जबाबदारीमुळे नाराज अमेरिकेतील ‘डेली मेल’ने दिलेल्या बातमीनुसार सीमा संकटासारखं अवघड खातं जाणीवपूर्वक कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे त्या नाराज असल्याचा दावा करण्यात आला आहे. सीमा संकटासारख्या संवेदनशील विषयाची जबाबदारी देऊन कमला हॅरिस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणं बायडेन हे इतर अनेक कारणांसाठी हॅरिस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक विषयांवरून नाराजी पत्रकार लेस्टर होल्ट यांनी जेव्हा सीमाप्रश्नाबाबत प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याचं उत्तर न देता ज्या प्रकारे हसून त्यांनी त्याला प्रतिसाद दिला, ही बाब बायडेन यांना पचनी पडली नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणं हॅरिस यांचं अप्रुव्हल रेटिंग बायडेन यांच्या तुलनेत जास्त घसरलं आहे. त्याचाही परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्यामुळे बायडेन नाराज असल्याची चर्चा आहे. हे वाचा- 3 वर्ष छुप्या पद्धतीनं बॉयफ्रेंड काढत होता अश्लील फोटो, गर्लफ्रेंडला कळालं अन्.. मागच्या दाराने हकालपट्टी कमला हॅरिस यांची न्यायालयात नियुक्ती करून त्यांच्या जागी इतर उमेदवाराची वर्णी लागण्याची शक्यता अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मात्र जाहीरपणे दोन्ही नेते याबाबत अवाक्षरही काढत असून सर्व काही आलबेल असल्याचं सांगण्यात येत आहे. जो बायडेन यांचं रेटिंगदेखील 53 टक्क्यांनी घसरलं असून ते 11 पॉइंट्सनी कमी झालं आहे. याचं खापर हॅरिस यांच्यावर फोडून बायडेन जनतेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचीदेखील चर्चा सुरू आहे.
  Published by:desk news
  First published: