मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तीन वर्ष छुप्या पद्धतीनं बॉयफ्रेंड काढत होता अश्लील फोटो, गर्लफ्रेंडला कळालं अन्...

तीन वर्ष छुप्या पद्धतीनं बॉयफ्रेंड काढत होता अश्लील फोटो, गर्लफ्रेंडला कळालं अन्...

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

ब्रिटनमधल्या (Britain) एका महिलेच्या बाबतीत असाच प्रकार घडला. बॉयफ्रेंडने (Boyfriend) तिच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लील फोटो (Naked Photos) काढले. तीन वर्षं तो हे कृत्य करत होता.

लंडन, 17 नोव्हेंबर : प्रेमाचं नाटक करून महिलांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये (Crime) संबंधित महिलेचे तिच्या नकळत अश्लील फोटो किंवा व्हिडिओ काढून ते व्हायरल (Viral) करणं किंवा व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचंदेखील दिसून येतं. छुप्या कॅमेराच्या साह्यानेदेखील असे प्रकार केले जातात. ब्रिटनमधल्या (Britain) एका महिलेच्या बाबतीत असाच प्रकार घडला. बॉयफ्रेंडने (Boyfriend) तिच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लील फोटो (Naked Photos) काढले. तीन वर्षं तो हे कृत्य करत होता. या पीडित महिलेने या संदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला न्यायालयानं सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.

`डेली मेल`च्या वृत्तानुसार, 24 वर्षांच्या लुसी लियर (Lucy Lear) हिने 2013 पासून 26 वर्षांच्या डेल बास्टीनला (Dale Bastin) डेट करणं सुरू केलं. 2015मध्ये त्यांना एक अपत्य झालं. त्यानंतर ते दोघं वेगळे राहू लागले. त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाला आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले.

दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा लुसीनं डेल बास्टीनचा मोबाईल (Mobile) त्याच्या नकळत तपासला, तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला. कारण तिला डेल बास्टीनच्या मोबाईलमध्ये तिच्या 30 पेक्षा अधिक न्यूड फोटोजचं (Nude Photos) कलेक्शन आढळून आलं. डेल बास्टीन सुमारे 3 वर्षं लुसीच्या नकळत तिचे अश्लील आणि न्यूड फोटो काढत होता. या प्रकाराविषयी लुसी पूर्णपणे अनभिज्ञ होती; मात्र हा प्रकार उघडकीस येताच तिला धक्का बसला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO

याबाबत लुसीनं सांगितलं, की `माझं डेल बास्टीनवर प्रेम होतं; मात्र त्यानं केलेलं कृत्य बघता मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकेन असं मला वाटत नाही. मी जेव्हा बास्टीनला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी सर्वात भाग्यशाली मुलगी आहे, असं मला वाटलं होतं. परंतु नंतर दिवस बदलत गेले. मी झोपलेली असताना, बाथरूममध्ये अंघोळ करत असताना, कपडे बदलत असताना, माझा बॉयफ्रेंड डेल बास्टीन यानं माझे अश्लील फोटो काढले. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये या प्रकाराबाबत मी पोलिसांना फोन करून डेल बास्टीनची तक्रार केली. जुलै 2021 मध्ये न्यायालयानं या प्रकरणी डेल बास्टीनला सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली.` तसंच न्यायालयानं यापुढे बास्टीनला लुसीसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवण्यास मनाई केली आहे.

First published:

Tags: Crime news, England