नवी दिल्ली, 19 जानेवारी: अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान कमला हॅरिस (kamala harris) यांनी पटकावला आहे. कमला हॅरिस 21 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतील. कमला हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष पदाची (Vice President of US) सूत्र हाती घेताना कमला हॅरिस भारताचा पारंपारिक पोशाख असलेली साडी नेसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत फॅशन डिझायनर बिभू मोहपात्रा यांनी सांगितले की, ‘कमला हॅरिस यांनी उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेताना साडी नेसण्याचा निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.’ मोहापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, ‘मॅडम व्ही.पी. कमला हॅरिस लोकांना एकत्र आणण्यासाठी साडीचा एक चांगला वापर करु शकतात.’ कमला हॅरिस यांना प्रचाराच्या भाषणादरम्यान एका व्यक्तीने साडीसंदर्भात प्रश्न विचारला होता. ही निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही भारतीय पारंपरिक पोशाख असलेली साडी नेसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना कमला हॅरिस यांनी ‘आधी निवडणूक जिंकूया’ असे उत्तर दिले होते. (हे वाचा- दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान ) बिभू मोहपात्रा यांना विश्वास आहे की, ‘कमला हॅसिर साडीचा वापर नवीन प्रशासनाच्या माध्यमातून देशाला एकत्रित करण्यासाठी करु शकतील.’ त्यांचे असे सुद्धा म्हणणे आहे की, ‘कमला हॅरिस यांचा साडीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे कमला हॅरिस यांना पहिल्यापेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा मिळाला.’ कमला हॅरिस यांच्या आई शामला गोपालन हॅरिस भारतीय आहेत. आईच्या घरी कुटुंबियांसोबत काढलेला कमला हॅरिस यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती.त्यांचे मूळ गाव तामिळनाडूमध्ये आहे. कमला हॅरिस या बऱ्याचदा भारतामध्ये आल्या आहेत. त्यांचा सांभाळ आईने केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. कमला हॅरिस उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी त्यांनी साडी नेसावी असं मत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ट्विटरवर अनेक युजर्सनी कमला हॅरिस यांचा फोटो शेअर करत त्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताना साडी नेसतील असं म्हटलं आहे. कमला हॅरिस या कोणत्या पोशाखाची निवड करतील हे प्रत्यक्ष त्या कार्यक्रमातच कळेल. पण सोशल मीडियावर मात्र त्यांनी यावेळी साडीचीच निवड करावी हा विषय ट्रेंड होत आहे. भारतीयांनी तर याबाबत अनेक ट्वीट केले आहेत.
It would be awesome if @KamalaHarris wore a traditional Indian outfit https://t.co/x3z9r9Zkit
— Dr. Hem Nalini Morzaria-Luna (@hmorzaria) January 16, 2021
अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन (Joe Biden) यांची निवड झाली आहे. त्यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या उपाध्यक्ष झाल्या. कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित करताना भारताचा उल्लेख केला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील ऑकलंड येथे कमला हॅरिस यांचा 20 ऑक्टोबर 1964 रोजी जन्म झाला. हॉवर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे.