घर, बाईक, सायकल, कार, कपडे आणि अशा बऱ्याच वस्तू भाड्यानं घेता येतात. पण कोणत्या व्यक्तीला भाड्यानं घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? आता तुम्ही म्हणाल व्यक्तीला भाड्यानं कोण घेणार? पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जपानमध्ये एका व्यक्तीला भाड्यानं घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्या व्यक्तीसाठी ते हजारो रुपये द्यायला तयार होतात. (फोटो सौजन्य - ट्विटर @morimotoshoji)
जपानमधील 37 वर्षांचा शोजी मोरिमोटो. लोकांना कंपनी देणं हेच त्याचं काम. लोक त्याला भाड्यानं घेतात. त्यासोबत आपला वेळ घालवतात आणि या कामासाठी त्याला पैसेही मिळतात. (फोटो सौजन्य - ट्विटर @morimotoshoji)
सुरुवातीला तो ही सेवा फ्री द्यायचा. पण नंतर त्यानं ट्विटवर पोस्ट केली की, मला स्वतःला भाड्यानं देऊ इच्छितो. एकटं म्हणून तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर मी तुमच्यासोबत असेन. असं त्यानं सांगितलं. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं तीन हजार लोकांना साथ दिली. दररोज त्याच्याकडे 3 ते 4 क्लाइंट्स येतात. (फोटो सौजन्य - ट्विटर @morimotoshoji)
लोकांसोबत जाण्यासाठी शोजीला यासाठी 10,000 येन म्हणजे 7000 रुपये मिळतात. यामध्ये प्रवास आणि खाण्यापिण्याचाही खर्च असतो. (फोटो सौजन्य - ट्विटर @morimotoshoji)
कुणी त्याला आपल्यासोबत फिरायला नेतं, कुणी फोटो काढायला नेतं, कुणी आपलं दुःख शेअर करायला नेतं, तर कुणी आपला एकटेपणा दूर करण्यासाठी नेतं. शोजी सांगतो मी लोकांचा एकटेपणा आणि त्यांच्या समजू शकतो आणि त्यामुळेच मी त्यांचा आधार बनतो. (फोटो सौजन्य - ट्विटर @morimotoshoji)