काबुल, 1 सप्टेंबर : अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kabul International Airport) बंद ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत या विमानतळावर अमेरिकेचा ताबा होता. या विमानतळाचं व्यवस्थापनदेखील अमेरिकेकडून केलं जात होतं. मात्र आता अमेरिकेनं माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तालिबानच्या ताब्यात आलं असून सध्या ते बंद ठेवण्यात आलं आहे.
Kabul’s airport, now under the control of the Taliban, was quiet following the withdrawal of the last U.S. troops from Afghanistan https://t.co/xbGJCSS47a pic.twitter.com/NOdSZR4acF
— Reuters (@Reuters) August 31, 2021
अफगाणिस्तानमध्ये अद्यापही हजारो परदेशी नागरिक अडकून पडले आहेत. अनेक अफगाणी नागरिकांनादेखील देश सोडून बाहेर पडण्याची इच्छा आहे. हे सर्व नागरिक सध्या पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. हवाई मार्गे बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे आता पाकिस्तान किंवा इराणमार्गे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात हजारो नागरिक असल्याचं चित्र आहे.
इराणकडून नियम शिथील
इराणनं सीमाभागातील नियम काही काळापुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. इराणच्या सीमेवर जे नागरिक दाखल होत आहेत, त्यांच्या कागदपत्रांची तपाशणी करून त्यांना देशात येऊ देण्याची भूमिका इराणनं घेतली आहे. अनेक नागरिक इराणमध्ये प्रवेश करून तिथल्या विमानतळावरून आपापल्या देशात जाण्याच्या तयारीत आहेत. तर अनेकांनी पाकिस्तानच्या सीमेवर गर्दी करून पाकिस्तानमार्गे इच्छित स्थळ गाठण्याची तयारी केली आहे.
ब्रिटन आणि तालिबानची बोलणी सुरू
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येणार हे निश्चित झाल्यानंतर ब्रिटनने तालिबानसोबत चर्चा सुरू केल्या आहेत. अफगाणिस्तानात अडकलेल्या ब्रिटीश नागरिकांना सेफ पॅसेज देण्याचं आश्वासन तालिबाननं दिलं असून जमेल त्या मार्गाने नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ब्रिटनने पाकिस्तान, उजबेकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आपल्या टीम तैनात केल्या असून त्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत.
हे वाचा - धक्कादायक! SWIGGY BOY ने केला हॉटेल मालकाचा खून
दरम्यान, भारत सरकारनेदेखील तालिबानसोबत चर्चा सुरू केली असून कतारमध्ये या औपचारिक चर्चेची पहिली फेरीदेखील पार पडली आहे. भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी पाठवणे आणि अफगाणिस्तानच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ न देणे या दोन बाबींवर या बैठकीत चर्चा झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Iran, Kabul, Pakisatan, Taliban