Home /News /crime /

धक्कादायक! SWIGGY BOY ने केला हॉटेल मालकाचा खून, ऑर्डर पॅक करायला उशीर झाल्याने मारली गोळी

धक्कादायक! SWIGGY BOY ने केला हॉटेल मालकाचा खून, ऑर्डर पॅक करायला उशीर झाल्याने मारली गोळी

खून झालेले हॉटेल मालक सुनील

खून झालेले हॉटेल मालक सुनील

हॉटेलकडून (Hotel) ऑर्डर पॅक (Order pack) करायला उशीर होत असल्याचा राग आल्याने स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयने (Swiggy delivery boy) थेट हॉटेलच्या मालकाचाच खून (Murder) केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : हॉटेलकडून (Hotel) ऑर्डर पॅक (Order pack) करायला उशीर होत असल्याचा राग आल्याने स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयने (Swiggy delivery boy) थेट हॉटेलच्या मालकाचाच खून (Murder) केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला हा डिलिव्हरी बॉय हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर पिक-अप करण्यासाठी आला होता. मात्र ऑर्डरचं पॅकिंग करायला उशीर होत असल्याच्या कारणावरून त्याची हॉटेलमधील वेटरसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर मध्यस्थी करायला सरसावलेल्या मालकाची डिलिव्हरी बॉयने गोळ्या घालून हत्या केली. ऑर्डरवरून झाला वाद दिल्लीतील ग्रेटर नोएडा परिसरात सुनील यांचा झमझम किचन नावाचा ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी साडे बारा वाजता एक चिकन बिर्याणी आणि पुरीभाजीची ऑर्डर आली. ती ऑर्डर स्विकारून हॉटेलमधील वेटर नारायणने काम सुरू केले. ही ऑर्डर घेण्यासाठी डिलिव्हरी बॉय जेव्हा दाखल झाला, तेव्हा केवळ चिकन बिर्याणी तयार होती आणि पुरीभाजी तयार करण्याचं काम सुरु होतं. पुरीभाजी अजूनही पॅक का केली नाही, अशी विचारणा करत डिलिव्हरी बॉयनं नारायणसोबत भांडण सुरु केलं. नारायणला तो शिव्यादेखील देऊ लागला. हे पाहून हॉटलचे मालक सुनील यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र डिलिव्हरी बॉयला राग सहन न झाल्याने त्याने थेट सुनील यांच्या डोक्यात गोळी मारली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - मटणाचे पैसे मागितल्याचा आला राग, केली दुकानदाराची हत्या पोलीस तपास सुरू गोळी मारल्यानंतर डिलिव्हरी बॉयने तिथून काढता पाय घेतला. पोलिसांनी सध्या या डिलिव्हरी बॉयचा शोध सुरू केला असून तो अजून पोलिसांना सापडलेला नाही. स्विगीवरील तपशील आणि हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एका ऑर्डर पॅक करण्याच्या मुद्द्यावरून हॉटेल मालकाला आपला जीव गमावावा लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Delhi, Murder

    पुढील बातम्या