मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Kabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग

Kabul Airport Firing Live Updates: भीषण बाँबस्फोटांनंतर दोन दिवसात पुन्हा काबुल एअरपोर्टवर फायरिंग

गुरुवारी काबुल विमानतळावर(Kabul Airport Blast) झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला.

गुरुवारी काबुल विमानतळावर(Kabul Airport Blast) झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला.

गुरुवारी काबुल विमानतळावर(Kabul Airport Blast) झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला.

काबुल, 28 ऑगस्ट: अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे गेल्यानंतर हिंसा वाढली आहे. काबुल एअरपोर्टवर देश सोडून जाणाऱ्यांची गर्दी वाढत होती, तेव्हाच गुरुवारी विमानतळाबाहेर भीषण आत्मघातकी हल्ला झाला. यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 150 जणांचा म़ृत्यू (Kabul Airport death toll) झाला आहे. याशिवास शेकडो जखमी आहेत.(Kabul Airport Suicide bombing. या भीषण Suicide Attack नंतर दोनच दिवसात काबुल विमानतळाबाहेर शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार झाला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.

विमानतळाच्या गेटबाहेरच बेधुंद गोळीबार करण्यात आला. तो कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामध्ये कुणाचा जीव गेलाय की नाही हेही अद्याप अस्पष्ट आहे.

गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या ‘आयसिस-के’ने (ISIS-K) ने घेतली आहे. अमेरिकी सैन्यावर आणि त्यांना साथ देणाऱ्या अफगाण सैन्यावर (Attack on American army) आपण हल्ला केल्याचं ते म्हणाले. त्यांनी आपल्या स्टेटमेंटसोबत हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला. या फोटोमध्ये हल्लेखोर आयसिसच्या (IS) काळ्या झेंड्यासमोर बॉम्ब लावलेला बेल्ट घालून उभा असल्याचं दिसत आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या 13 सैनिकांचा (America soldiers died) मृत्यू झाला.

काबुल एअरपोर्ट स्फोटाचं India Connection

बागराम तुरुंगातून (Bagaram Jail) तालिबानने सुटका केलेले दहशतवादी आणि बंडखोरांमध्ये केरळच्या 14 नागरिकांचा समावेश होता. 26 ऑगस्ट रोजी काबूलमधल्या तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेर इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसचा (Improvised Explosive Device - IED) स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी नागरिकांना सुन्नी पश्तून दहशतवादी गटाने ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे; मात्र याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. गुप्तचर संस्थेच्या माहितीतून असे संकेत मिळत आहेत, की काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटानंतर लगेचच दोन पाकिस्तानी नागरिकांकडून IED जप्त करण्यात आली.

काबूल विमानतळावरील स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर

काबूल विमानतळावर बुधवारी बॉम्बस्फोट झाले (Kabul Airport Blast) होते. यात 13 अमेरिकेच्या सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते. . या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं (IS-KP) घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 48 तासातच अमेरिकेनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US carried out drone strike against Islamic State) केला आहे. पेंटागननं याबद्दलची माहिती दिली आहे. ठरवलेलं टार्गेट उद्धवस्त केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Afghanistan, Breaking News, Kabul