चेन्नई, 25 ऑगस्ट: कर्नाटकातील भाजप नेते (BJP Leader) आणि माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarakiholi) यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल (Obscene Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तामिळनाडूचे भाजपाचे महासचिव के टी राघवन (KT Raghavan Resign) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये के टी राघवन यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती पक्षातील एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.
पक्षातील अन्य नेते मदन रविचंद्रन यांनी हा व्हिडीओ युट्युबवर प्रसारीत केला आहे. पण या व्हिडीओच्या विश्वासहार्यतेची कोणतीही पुष्टी न्यूज18 करत नाही. के टी राघवन यांनी एक ट्वीट करत संबंधित आरोपांचं खंडण केलं आहे. तसेच संबंधित व्हिडीओबाबत आपण कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना
यावेळी के टी राघवन म्हणाले की, “तामिळनाडूचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते आणि जे माझ्याबरोबर आहेत त्यांना माहीत आहे की मी कोण आहे? गेली 30 वर्षे मी कोणत्याही फायद्याशिवाय पक्षाचं काम करत आहे. राघवन यांनी पुढं लिहिलं की, "सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओबाबत मला कळलं आहे. माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. पण माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. शेवटी न्यायाचाच विजय होईल. "
हेही वाचा-भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर
दुसरीकडे, संबंधित व्हिडीओ YouTube वर प्रसारित करणाऱ्या रविचंद्रन यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या टीमकडे अशा 15 नेत्यांच्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ फुटेज आहेत, जे येत्या काळात युट्युबवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. रवीचंद्रन यांनी NDTV ला सांगितलं की, भाजप नेत्यांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाचे आणि अत्याचाराबाबत अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर संबंधित नेत्यांविरोधात स्टींग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाची प्रतिमा सुधारणं हेच आपलं ध्येय आहे, असंही ते म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime news, Tamilnadu, Viral video.