मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Kabul Airport Blast: 'वादळात प्लॅस्टिक पिशव्या उडतात तसे मानवी अवयव उडत होते...', काबूल स्फोटातून वाचलेल्या व्यक्तीचा भयंकर अनुभव

Kabul Airport Blast: 'वादळात प्लॅस्टिक पिशव्या उडतात तसे मानवी अवयव उडत होते...', काबूल स्फोटातून वाचलेल्या व्यक्तीचा भयंकर अनुभव

काबूलमधील ब्लास्टनंतर हॉस्पिटलमधील परिस्थिती (फोटो-AP)

काबूलमधील ब्लास्टनंतर हॉस्पिटलमधील परिस्थिती (फोटो-AP)

Kabul Airport Blast: या स्फोटाची विदारक दृश्यं जगभरात पसरली आहेत. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या एका व्यक्तीनं या घटनेचे केलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा येईल.

काबूल, 27 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवलेल्या तालिबाननं (Taliban) आपल्या क्रुरतेचं दर्शन घडवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधून जीव वाचवून मिळेल त्या देशात आसरा घेण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो अफगाणी नागरिकांची (Afghan Citizen) गर्दी झाली आहे. अमेरिकन (USA Force) सैन्यासह नाटो देशांचे (NATO Countries) सैन्य लोकांच्या सुटकेसाठी कार्य करत आहे; पण आता तालिबानी सरकारनं त्यावर निर्बंध आणत, हिंसाचार घडवण्यास सुरुवात केली आहे.

काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) देशाबाहेर पडण्याच्या आशेने प्रचंड संख्येनं जमलेल्या जमावात गुरुवारी (26 ऑगस्ट 21) आत्मघातकी पथकाच्या (Suicide Bomb Attack) सहाय्यानं प्रचंड मोठे बॉम्बस्फोट (Bomb Explosion) घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शक्तीशाली बॉम्बस्फोटात अनेक लोकांच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आणि त्याचबरोबर या देशाबाहेर जाऊन दहशतमुक्त, स्वतंत्र आयुष्य जगण्याची स्वप्न बघणाऱ्या हजारो नागरिकांच्या आशाही उद्ध्वस्त झाल्या.

हे वाचा-''आम्ही देवाचे आभार मानतो...'', काबूल स्फोटातून थोडक्यात बचावले 160 शीख, हिंदू

या स्फोटाची विदारक दृश्यं जगभरात पसरली आहेत. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या एका व्यक्तीनं या घटनेचे केलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा येईल. पूर्वीच्या सरकारशी आणि नागरी गटांशी संबंधित लोकांना तालिबानचा धोका असल्यानं अमेरिकेचा विशेष व्हिसा असलेला आंतरराष्ट्रीय विकास गटाचा माजी कर्मचारी असलेल्या या व्यक्तीनं आपली ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर इथल्या प्रत्यक्ष स्थितीची माहिती दिली. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.

मीडिया अहवालानुसार, हा कर्मचारीदेखील एखाद्या विमानात जागा मिळेल आणि इथून बाहेर पडता येईल या आशेने हजारो लोकांसह काबूल विमानतळाच्या एबी गेटवर (Abbey Gate) दहा तासांपासून अधिक काळ रांगेत उभा होता. ‘संध्याकाळी पाच वाजत आले होते आणि अचानक प्रचंड मोठा आवाज झाला. माझ्या पायाखालची जमीनच कोणीतरी खेचून घेतल्यासारखं वाटलं. माझ्या कानाचे पडदे फाटले की काय असं मला वाटलं. अनेक मृतदेह आणि शरीरांतील अवयव प्लास्टिकच्या पिशव्यांसारखे हवेत उडताना मी पाहिले. बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मृतदेह, मानवी शरीरांतील अवयव, जखमी पुरुष, स्त्रिया आणि मुले इतस्तत: पडली होती,’ असं वर्णन या व्यक्तीने केलं आहे.

हे वाचा-Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध

‘आतापर्यंतच्या आयुष्यात असा विनाशकारी दिवस यापूर्वी कधीही पाहिला नव्हता; परंतु आज मी स्वतःच्या डोळ्यांनी सर्वांत विनाशकारी दिवस पाहिला. 20 वर्षांपूर्वी तालिबान्यांना पहिल्यांदा सत्तेवरून हाकलल्यानंतर काबूलने वारंवार असे आत्मघातकी हल्ले सहन केले आहेत. इथल्या रहिवाशांनाही त्याची सवय झाली आहे. अशी घटना घडली की पोलीस आणि सुरक्षा पथके येऊन मृत आणि जखमी व्यक्तींना घेऊन जात. यावेळी मात्र चित्र वेगळे होते. परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. मृतदेह (Dead Bodies) आणि जखमींना (Wounded) रुग्णालयात हलवण्यासाठी कोणीही नव्हते. अनेक मृतदेह, जखमी लोक रस्त्यावर आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात पडले होते. कालव्याचे पाणीही रक्ताच्या रंगानं लालभडक झाले होते. स्वयंसेवी लोकांनी नंतर जखमींना रुग्णालयात हलवलं; पण एकंदरीत जनतेची बेवारस अवस्था धक्कादायक आहे, असं त्यांनी सांगितलं.

‘शारीरिकदृष्ट्या, मी ठीक आहे. पण आजच्या स्फोटामुळे बसलेला मानसिक धक्का मला कधीही सामान्य जीवन जगू देईल, असं मला वाटत नाही.’ अशी भावना या व्यक्तीनं व्यक्त केली. त्यावरून सहज लक्षात येईल की काबुलमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये किती भयानक परिस्थिती आहे.

First published:

Tags: Afghanistan, Bomb Blast, Taliban