टोकियो, 13 डिसेंबर : चवीचं खाणंपिणं हा अनेक लोकांची आवडती गोष्ट असते. जगभरात नाना तऱ्हेच्या खाद्यसंस्कृती आहेत, 'जसा देश तसा वेश' असं म्हणतात त्याचप्रमाणे जसा देश तसे खाणेही असते. चीनसारख्या देशांमध्ये (China)बहुतांश सगळे प्राणी, किडे खाल्ले जातात. अगदी साप, वटवाघूळ, उंदीरदेखील खाल्ले जातात. चीनमध्ये मोठ्या प्राण्यांपासून ते अगदी लहानशा किटकांचे सूप आणि अनेक विविध पदार्थ केले जातात. चीनशी थोडेसे साधर्म्य असणारी खाद्यसंस्कृती जपानमध्येदेखील आढळते. जपानमध्येदेखील (Japan)अनेक प्राणी, पक्षी, किडे खाल्ले जातात. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा एका प्राण्यापासून इथं चक्क बिअर बनवली जाते. त्या प्राण्याचे नाव ऐकले तरी पाठीच्या कण्यातून शिरशिरी येईल. ही बिअर असते चक्क झुरळांपासून (Cockroach) बनवलेली.
जपानी लोक (Japani People) झुरळांपासून बनवलेल्या या बिअरचा (Beer) मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतात. हे पेय इन्सेक्ट सॉर (Insect Sour) किंवा कोंचू सॉर (Konchu Sour) म्हणून जपानमध्ये ओळखले जाते. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या झुरळापासून ही बिअर बनवली जाते. या जातीची झुरळं पाण्यात असलेले इतर कीटक आणि मासे खातात. ही झुरळं दिव्यांभोवती मोठ्या प्रमाणात जमतात, त्यामुळे जपानमध्ये दिवे लावून ही झुरळं पकडली जातात. यानंतर, ती गरम पाण्यात टाकून ते पाणी उकळले जाते. त्यानंतर या झुरळांना त्या पाण्यात तीन ते चार दिवस कुजवले जाते, नंतर त्यांचा रस काढून घेतला जातो. हा रस इन्सेक्ट सॉर किंवा कोंचू सॉर म्हणून ओळखला जातो, झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सकाळी घराबाहेर पडले तेव्हा होते रुग्णवाहिका चालक, दुपारपर्यंत झाले कोट्यवधी!
20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून जपानमध्ये या झुरळांपासून बिअर बनवण्याची प्रथा सुरू झाली. 'कबुटोकामा' (kabutokama) या पारंपरिक पद्धतीने (Traditional Method) ही बिअर बनवली जाते. या बिअरची किंमतही इतर बिअरच्या तुलनेत अधिक असते. या बिअरच्या प्रत्येक बाटलीची किंमत सुमारे 450 रुपये आहे.
नवसाला पावणार्या रेणुका देवीची दानपेटी पुन्हा चोरांनी फोडली, बीडमध्ये खळबळ
डेली स्टारच्या वृत्तानुसार, जपानमध्ये तैवानी नर झुरळ अतिशय चवदार मानले जाते. ते अधिक रसाळ असते. या झुरळाची तुलना उच्च प्रतीच्या कोळंबीशी केली जाते. ही झुरळं उकडून देखील खाल्ली जातात किंवा सूप, स्ट्यूसाठी मसाला म्हणूनही याचा वापर केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beer